शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘शुभमंगल’चा मंडप तयार, पण जोडपीच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रति जोडप्यास दहा हजार रुपये अनुदान देण्यात येते व सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे दोन हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते. ही योजना महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविली जाते.

ठळक मुद्देदहा हजारांचे मिळते अनुदान : महिला व बालविकास विभागाची योजना

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकरी, शेतमजूर लेकींच्या सामूहिक विवाहासाठी अर्थसाहाय्य व्हावे, यासाठी आठ वर्षांपूर्वी महिला व बालविकास विभागाच्या वतीने शुभमंगल सामूहिक विवाह योजना सुरू करण्यात आली. मात्र, याचा लाभ घेण्यासाठी जोडपीच येत नसल्याने जिल्ह्यात या योजनेला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतक्याच लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. मागच्या वर्षी ८६ जोडप्यांनी याचा लाभ घेतला असला तरी यावर्षी एकही प्रस्ताव आलेला नाही.या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रति जोडप्यास दहा हजार रुपये अनुदान देण्यात येते व सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे दोन हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते. ही योजना महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविली जाते. दरवर्षी जे प्रस्ताव सादर होतील, त्याची छाननी महिला व बालविकास विभागाच्या वतीने केली जाते. त्यानंतर हे प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे अनुदान मंजुरीसाठी पाठविले जातात. मात्र, मागील काही वर्षात बोटावर मोजण्या इतक्याच जोडप्यांनी याचा लाभ घेतला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थींनी बँकेची माहिती, बँक शाखा, खाते क्रमांक, इत्यादींची माहिती अर्जात नमूद करून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयास सादर करावी. स्वयंसेवी संस्थेमार्फत आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयास अर्जासह सर्व एकत्रित दाखले सादर करावेत. विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या जोडप्याची व्हिडीओ रेकॉर्डींग आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र स्वयंसेवी संस्थेने सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच प्रत्येक जोडप्यामागे दोन हजार रुपये इतके प्रोत्साहनात्मक अनुदान अदा करण्यात येते.योजना चांगली असली तरी विवाह सोहळ्याबाबत अद्यापही अनेक वर व वधुकडील वडीलधारे गंभीर असल्याने या योजनेकडे ते पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे.जनजागृतीची गरजघर बांधणे आणि लग्न सोहळा आयोजित करणे सहज बाब नाही, हे सर्वांना ज्ञात आहे. यातील अवाढव्य खर्च वाचावा, यासाठी ही योजना असली तरी पालक याकडे गंभीरतेने बघत नाही. त्यामुळे जनजागृती गरज आहे.शुभमंगल सामूहिक विवाह योजनेअंतर्गत शेतकरी, मजूर यांच्या मुला- मुलींच्या विवाहासाठी मंगळसूत्र व इतर खर्चासाठी दहा हजार रुपये देण्यात येतात. चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी नोंदणी झालेल्या ८६ जोडप्यांना लाभ दिला. यावर्षी मात्र एकही जोडप्याचा प्रस्ताव आला नाही.-आर. एन. टेटेमहिला,बालविकास अधिकारी, चंद्रपूरअशा आहेत अटीया योजनेचा लाभ घेणाºया जोडप्यातील वधू ही महाराष्ट्रातील रहिवासी असावी,त्याबाबत ग्रामसेवक किंवा तलाठी यांचा दाखला असावा.विवाह सोहळ्याच्या दिवशी वराचे वय २१ वर्षे व वधूचे वय १८ वर्षे यापेक्षा कमी असू नये.याबाबत जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा जन्माच्या स्थानिक प्राधिकाºयाने दिलेला दाखला किंवा वैद्यकीय अधिकाºयाचे वयाबाबतचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते.तलाठी किंवा तहसीलदार यांनी दिलेला एक लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला, वधू-वरांना प्रथम विवाहासाठीचे हे अनुदान पुनर्विवाहाकरिता अनुज्ञेय राहणार नाही.वधू विधवा किंवा घटस्फोटित असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी अनुज्ञेय राहील.

टॅग्स :marriageलग्न