चंद्रपुरातील महिला व पुरूष टेन्शनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST2021-01-01T04:19:46+5:302021-01-01T04:19:46+5:30
मानवाच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. वेळी-अवेळी खाणे, स्पर्धेमध्ये टिकण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात ताण येतो. तसेच कौटुंबिक तणावातूनही रक्तदाब ...

चंद्रपुरातील महिला व पुरूष टेन्शनमध्ये
मानवाच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. वेळी-अवेळी खाणे, स्पर्धेमध्ये टिकण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात ताण येतो. तसेच कौटुंबिक तणावातूनही रक्तदाब वाढत असतो. तर आईवडिलांना रक्तदाब असेल तर त्यांच्या वंशजांनाही रक्तदाब असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याला वेळीच आळा घालण्याची गरज आहे. अशा रुग्णांनी डॅाक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा. आरोग्य विभागातर्फे आजाराबाबत जनजागृती सुरू आहे.
औषधौपचार घ्यावा
रक्तदाबामुळे अनेक मोठे आजार होऊ शकतात. डोळे, किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॅाक्टरांकडून रक्तदाब तपासणी करावी, त्यांच्या सल्ल्यानूसार उपचार घ्यावा. जीवनशैलीत बदल करावा.
- राजकुमार गहलोत, आरोग्य अधिकारी.
बॉक्स
काय काळजी घ्यावी?
रक्तदाबाला दूर ठेवण्यासाठी नियमित व्यायम करावा. रक्तदाब तपासणी करावी, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा, जेवण वेळेवर करावे, वजन नियंत्रणात ठेवावे. आहारामध्ये मोड आलेली कडधान्ये, ताजा भाजीपाला, फळे आदींचे सेवन करावे, कुठलाही ताण येईल, अशा गोष्टी टाळून रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकतो.