दहा जण पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:20 IST2021-06-28T04:20:13+5:302021-06-28T04:20:13+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये दहा जण नव्याने पाॅझिटिव्ह आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. ५४ जणांनी ...

Ten were positive and one died | दहा जण पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

दहा जण पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये दहा जण नव्याने पाॅझिटिव्ह आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. ५४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर ३८६ जणांवर उपचार सुरू आहे.

बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील एक, चंद्रपूर तालुका एक, मूल दोन, गोंडपिपरी एक, वरोरा एक, कोरपना चार, तर बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभिड, सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा, राजुरा, चिमूर, जिवती व इतर ठिकाणच्या रुग्णांचा समावेश आहे.

आज मृत झालेल्यांमध्ये राजुरा तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.

बाॅक्स

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ६४४ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार ७३१ झाली आहे. सध्या ३८६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख ५२ हजार ८९९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४ लाख ६५ हजार ३५५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १,५२७ बाधितांचे मृत्यू झाले आहे.

Web Title: Ten were positive and one died