डिजिटल अभ्यासिकेसाठी दहा लाखांचा निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:21 IST2021-01-10T04:21:23+5:302021-01-10T04:21:23+5:30
सुभाष धोटे : राजुरा तालुका पत्रकार संघातर्फे सत्कार समारंभ राजुरा : पत्रकारानी एकाच दृष्टिकोनातून विचार न करता सर्व स्तरातील ...

डिजिटल अभ्यासिकेसाठी दहा लाखांचा निधी देणार
सुभाष धोटे : राजुरा तालुका पत्रकार संघातर्फे सत्कार
समारंभ
राजुरा : पत्रकारानी एकाच दृष्टिकोनातून विचार न करता सर्व स्तरातील नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्याविषयी लिहिले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी यावेळी केले. पत्रकार संघाचा डिजिटल अभ्यासिका व ग्रंथालयासाठी दहा लाखांचा निधी आपल्या स्थानिक विकास निधीतून देण्याचे त्यांनी घोषित केले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी राजुरा तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकार, कोरोना योद्धा आणि आरटी वन वाघ जेरबंद करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे होते. उद्घाटक माजी आमदार अँड. वामनराव चटप, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष अरुण धोटे, सुमनताई मामूलकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम अडानिया, वकील संघाचे अध्यक्ष अँड.निनाद येरणे, पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसूरकर, डॉ. लहु कूळमेथे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार ॲड.वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर यांचेही भाषण झाले.
बॉक्स
यांचा झाला सत्कार
यावेळी मुक्त पत्रकार व विधी अभ्यासक अँड. दीपक चटप यांनी लिहिलेल्या शेती कायदे विषयक पुस्तकाचे प्रकाशन झाले.
या कार्यक्रमात स्व. महियार गुंडेविया स्मृती पुरस्कार मसूद अहमद, प्रभाकरराव मामुलकर स्मृती पुरस्कार गणेश बेले, राघवेंद्रराव देशकर स्मृती पुरस्कार रत्नाकर चटप, सुरेंद्र डोहे स्मृती पुरस्कार सिद्धार्थ गोसावी, शंकरराव देशमुख स्मृती पुरस्कार संतोष कुंदोजवार यांना देण्यात आला. अतिथीच्या हस्ते शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह, रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कोरोना महामारी काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.लहू कुळमेथे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश नगराळे, पालिका सभापती वज्रमाला बोलमवार, डॉ.बिपीनकुमार ओदेला, डॉ.माधुरी वैद्य, मुख्य परिचारिका रिता रॉय, प्रितू झाडे, उमेश डहाळे,संजय मंथनवार,आरोग्यसेवक अनिल देठे, बालाजी गोटमुखले, आरोग्यसेविका मंगला चव्हाण, आशा स्वयंसेविका किरण कलास्केकर, बबिता तालन, मंगला मेश्राम आणि नगर पालिकेचे सफाई कर्मचारी नीलेश टाक यांचा सत्कार करण्यात आला.
राजुरा क्षेत्रातील दहा नागरिकांचे बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद केल्याबद्दल वनविभागाच्या अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने राजुरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांनी सन्मान स्वीकारला. संचालन आनंद चलाख व बादल बेले, प्रास्ताविक अनिल बाळसराफ व आभार बि.यू. बोर्डेवार यांनी मानले.