मृत महिलेच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत
By Admin | Updated: November 29, 2014 23:17 IST2014-11-29T23:17:41+5:302014-11-29T23:17:41+5:30
झाडू गवत कापण्यासाठी गेलेल्या निंबाळा (मोठा) येथील सुरेखा सज्जन शेंडे (३५) हिला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना

मृत महिलेच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत
वन विभागाने दिले लेखी आश्वासन : ग्रामस्थांवरील वनगुन्हे होणार रद्द
चिचपल्ली : झाडू गवत कापण्यासाठी गेलेल्या निंबाळा (मोठा) येथील सुरेखा सज्जन शेंडे (३५) हिला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना मृतदेह असलेली बैलबंडी गावापर्यंत ओढायला लावली. दरम्यान, शनिवारी मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तत्पूर्वी वनविभागाकडे ग्रामस्थांनी आपल्या काही मागण्या निवेदनाद्वारे केल्या. या मागण्या वनविभागाने मंजुर केल्या आहे.
मृत कुटुंबीयांना १० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील एकाला वनविभागाने नियमित रोजगार द्यावा, नाल्यावर बंधारा बांधून द्यावा या मागणीसह गावकऱ्यांवर असलेले वनगुन्हे मागे घेण्याची मागणी केली. या मागण्या वनविभागाने मंजुर केल्या आहे. याबाबत उपसरपंच नैताम यांच्याकडे लिखित आश्वासन दिले आहे. तत्काळ मदत म्हणून ५० हजाराची मदत मृत महिलेच्या कुटुंबीयांना दिली. तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कुटुंबीयांची भेट घेत सात हजाराची मदत दिली. (वार्ताहर)