सांगा कोणते बक्षीस द्यावे ?...
By Admin | Updated: March 3, 2017 00:50 IST2017-03-03T00:50:29+5:302017-03-03T00:50:29+5:30
न्यायालयाच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहरातील बेकायदेशिर धार्मिक स्थळांवर प्रशासनाने हातोडा चालविला.

सांगा कोणते बक्षीस द्यावे ?...
सांगा कोणते बक्षीस द्यावे ?... न्यायालयाच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहरातील बेकायदेशिर धार्मिक स्थळांवर प्रशासनाने हातोडा चालविला. यात मूल रोडवरील वनविभागाच्या कार्यालयापुढील माता मंदिर तोडले. रहदारीला अडथळा होत असल्याचे कारण पुढे करून मंदिरालगतचे कडुनिंबाचे गर्द सावलीचे झाडही प्रशासनाने एका दिवसात तोडले. असे असले तरी दीड महिन्यापासून झाडाची लाकडे अगदी वर्दळीच्या मार्गावरच पडून आहेत. वाहतुकीला असा अडथळा घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी कोणते बरे बक्षीस द्यावे....?