लोकसंख्या निकषावर तेली समाजाला आरक्षण हवे
By Admin | Updated: August 7, 2014 23:53 IST2014-08-07T23:53:15+5:302014-08-07T23:53:15+5:30
राज्यातील एकूण लोकसंख्येच्या २७ टक्के लोकसंख्या तेली समाजाची आहे. तर ओबीसी प्रवर्गात ३६२ जातींञचा समावेश आहे. या ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षण आहे. मात्र तेली समाजाच्या

लोकसंख्या निकषावर तेली समाजाला आरक्षण हवे
आठ टक्क्यांची मागणी : समरित यांचे निवेदन
चंद्रपूर : राज्यातील एकूण लोकसंख्येच्या २७ टक्के लोकसंख्या तेली समाजाची आहे. तर ओबीसी प्रवर्गात ३६२ जातींञचा समावेश आहे. या ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षण आहे. मात्र तेली समाजाच्या लोकसंख्येचा विचार करता या आरक्षणातून समाजाला पूर्ण न्याय मिळत नसल्याने तेली समाजाला आठ टक्के आरक्षण दिले जावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश समरित यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
ज्या समाजाचा आर्थिक व सामाजिक विकास झाला नाही, अशा समाजाचा दर्जा उंचाविण्यासाठी आरक्षण देण्याची घटनेत तरतुद आहे. मात्र अलिकडच्या काळात मतांच्या राजकारणावर डोळा ठेवून आरक्षण दिले जात असल्याने अन्य समाजघटकांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. भविष्यात मागस घटकांसमोर अंधकारमय आयुष्य जगण्याची पाळी येऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने अलिकडेच मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. राज्याची एकूण लोकसंख्या ११.८७ कोटी आहे. यात सर्वाधिक लोकसख्या अनुसूचित जातीची, त्यानंतर मराठा व कुणबी समाजाची आहे. १९६२ ते २०१४ या काळात मराठा समाजाचे अनेक आमदार निवडून आले. याच काळात तेली समाजाचेही आमदार निवडून आले. मात्र मराठा आमदारांच्या तुलनेत त्यांची संख्या कमी आहे. यामुळे तेली समाजाला आपला विकास साधता आला नाही. या समाजाच्या आर्थिक विकासाठी किमान आठ टक्के आरक्षण द्यावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)