तांत्रिक अडचणीत सापडल्ंो क्रीडा संकुले
By Admin | Updated: June 9, 2014 23:34 IST2014-06-09T23:34:05+5:302014-06-09T23:34:05+5:30
येथील क्रीडा विभागाला चंद्रपूर, जिवती, पोंभुर्णा, नागभीड आणि सावली तालुक्यात अजूनही क्रीडा संकुले उभारता आले नाही. या सत्रात जागेसह निधीही मिळाला. मात्र तांत्रिक अडचणीचे कारण पुढे आल्याने

तांत्रिक अडचणीत सापडल्ंो क्रीडा संकुले
चंद्रपूर : येथील क्रीडा विभागाला चंद्रपूर, जिवती, पोंभुर्णा, नागभीड आणि सावली तालुक्यात अजूनही क्रीडा संकुले उभारता आले नाही. या सत्रात जागेसह निधीही मिळाला. मात्र तांत्रिक अडचणीचे कारण पुढे आल्याने क्रीडा संकुले उभारावी तरी कशी, असा प्रश्न अधिकार्यांना पडला आहे.
१९७0 मध्ये क्रीडा विभागाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सर्वच जिल्ह्याच्या तालुकास्थळी क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सिंदेवाही, ब्रह्मपुरी, राजुरा, वरोरा, चिमूर, भद्रावती, बल्लारपूर, मूल, गोंडपिंपरी, चंद्रपूर आणि अन्य तालुक्यांच्या ठिकाणी जागाच उपलब्ध नाही. जिथे आहे ती जागा गावापासून फार लांब आहे. त्यामुळे तेथे बांधकाम कसे करायचे, हा प्रश्न अधिकार्यांना पडला आहे. नागभीड येथे क्रीडा संकुलासाठी बर्याच प्रयत्नांनी जागा मिळाली. मात्र, ती जागा नवखळा येथे आहे. नवखळा नागभीडपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. पोंभुर्णा येथे क्रीडा संकुलासाठी मिळालेली जागा गावापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे येथे बांधकाम करण्यास अधिकारी फारसे उत्सुक नाहीत.
जिवती आणि कोरपना येथेही जागेचा प्रश्न कायम आहे. याच कारणामुळे येथील क्रीडा संकुलाचे काम थंडबस्त्यात होते. मात्र मधल्या काळात जिवती, पोंभूर्णा, सावली आणि कोरपना या तालुक्यातील क्रीडा संकुलासाठी जागा मिळाली. चंद्रपूर तालुक्याच्या ठिकाणी होणार्या क्रीडा संकुलासाठीही जागा मिळाली. त्यानंतर या सर्वच क्रीडा संकुलासाठी निधीही मिळाला. मात्र आता तांत्रिक अडचणीमुळे हे काम थंडबस्त्यात आहे. क्रीडा संकुलाचे काम त्वरित करून खेळाडूंना दिलासा द्यावा, अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत.(नगर प्रतिनिधी)