व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा!

By Admin | Updated: September 3, 2016 00:38 IST2016-09-03T00:38:26+5:302016-09-03T00:38:26+5:30

बालपणी दिले जाणारे संस्कार हे चिरकाळ टिकणारे असतात;...

Teachers should take initiative to create an addiction free society! | व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा!

व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा!

राजू आनंदपवार : चंद्रपूर पंचायत समितीत तंबाखूमुक्त कार्यशाळा
चंद्रपूर : बालपणी दिले जाणारे संस्कार हे चिरकाळ टिकणारे असतात; म्हणून या वयातच विद्यार्थ्यांना तंबाखू व अन्य व्यसनापासून परावृत्त केल्यास एक आदर्श समाज निर्माण होईल, असा आशावाद व्यक्त करीत या पवित्र कार्यात शिक्षकांनी पुढाकार घेऊन व्यसनमुक्त समाजनिर्मितीाठी कार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी राजू आनंदपवार यांनी केले.
पंचायत समिती चंद्रपूर आणि सलाम मुंबई फाऊंडेशनच यांच्या संयुक्त विद्यमाने कृषक भवन चंद्रपूर येथे मुख्याध्यापकांसाठी आयोजित एक दिवसीय ‘तंबाखूमुक्त शाळा’ या अभियानाच्या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यशाळेचे उद्घाटन सहाय्यक बीडीओ विजय पेंदाम यांनी केले. यावेळी प्रामुख्याने गटशिक्षणाधिकारी शारदा मोगरे, शिक्षण विस्तार अधिकारी सिंधू शेंडे, वर्षा फुलझेले, शालेय पोषण आहार समितीचे अधीक्षक्ष प्रदीप वझलवार, केंद्रप्रमुख विजय भोयर तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जे.डी. पोटे, पदशिक्षक प्रशांत कातकर यांची उपस्थिती होती.
प्रत्येक मुख्याध्यापकांनी आपली शाळा स्वच्छ ठेवून ग्रामीण भागातील जनतेमध्ये शौचालयाच्या वापरासंदर्भात जनजागृती करण्याच्या सूचनाही आनंदपवार यांनी दिल्या. संचालन जे.डी. पोटे यांनी तर आभार देवेंद्र गिरडकर यांनी मानले. कार्यशाळेत बहुसंख्य मुख्याध्यापक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Teachers should take initiative to create an addiction free society!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.