अध्यापन करताना शिक्षकांना स्वातंत्र्य द्यायला हवे : वसंत पुरके
By Admin | Updated: January 18, 2016 00:57 IST2016-01-18T00:57:06+5:302016-01-18T00:57:06+5:30
शिक्षण ही निरंतन चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणात हे विविध कलागुणांचा संगम असला पाहिजे. शिक्षकांना अध्यापन करताना स्वातंत्र्य द्यायला हवे,

अध्यापन करताना शिक्षकांना स्वातंत्र्य द्यायला हवे : वसंत पुरके
वरोरा : शिक्षण ही निरंतन चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणात हे विविध कलागुणांचा संगम असला पाहिजे. शिक्षकांना अध्यापन करताना स्वातंत्र्य द्यायला हवे, मात्र शिक्षकांनी समाजात जबाबदारपणे वागायला पाहिजे याकरिता शिक्षकांची गुणवत्ता वाढणे आवश्यक आहे. जे शिक्षक प्रामाणिकपणे शिकवितात त्यांचे कौतुक व्हायला पाहिजे, असे मत राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्रा.वसंत पुरके यांनी केले.
ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ व कर्मविर विद्यालय वरोराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘सध्याच्या शिक्षणाची दशा व दिशा’ या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. यावेळी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय देवतळे, लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ना.गो. थुटे, दिशा एज्युकेशन पार्इंटचे संचालक रूपेश घागी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
अध्यापन हे पवित्र कार्य आहे. खरा अध्यापक विद्यार्थ्यांमधील चांगल्या गुणांना सतत शोध घेत असतो व त्यांच्या विकासात चालना देतो, म्हणून तो समाजाला संजीवनी देवू शकतो आणि मुलांचे भविष्य घडवू शकतो. व्यक्तीच्या आचार विचारात होणारे बदल म्हणजे शिक्षण आणि व्यक्ती वर्तनातील चांगल्या गुणांचे शिक्षण म्हणजे सतपरिवर्तन. हे सतपरिवर्तन शिक्षणातून येते, असे मत प्रा.वसंत पुरके यांनी व्यक्त केले. शिक्षकांनी अध्यापनात नवीन तंत्राचा वापर करावा आणि वाचनावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी सेवानिवृत्त व गुणवंत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन, आभार शेंडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)