आवंटन प्राप्त होताच शिक्षकांचे वेतन

By Admin | Updated: May 9, 2016 00:56 IST2016-05-09T00:56:27+5:302016-05-09T00:56:27+5:30

पंचायत समिती चिमूर अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन आवंटन प्राप्त होताच दोन दिवसात पगार झाल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

Teacher's salary as soon as the allocation is received | आवंटन प्राप्त होताच शिक्षकांचे वेतन

आवंटन प्राप्त होताच शिक्षकांचे वेतन


चिमूर : पंचायत समिती चिमूर अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन आवंटन प्राप्त होताच दोन दिवसात पगार झाल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चिमूर यांच्याशी पंचायत समिती चिमूरने तब्बल दोन दिवस समस्या निवारण सभा घेतली. या सभेमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या सभेला संघटनेचे पदाधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व लेखा अधिकारी उपस्थित होते.
समस्या निवारण सभेमध्ये वेतनासंबंधी समस्या संघटनेने मांडली. वारंवार आवंटन प्राप्त झाल्यानंतरही वेतनास विलंब होतो. त्यामुळे संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने लावून धरली. या सभेमध्ये संघटनेच्या या मागणीला मान्य करून शिक्षकांच्या वेतनास विलंब होण्यास कारणीभुत असणाऱ्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल व यापुढे वेतनास विलंब होणार नाही, असे आश्वासन दिले.मार्च महिन्याचे आवंटन पंचायत समितीला प्राप्त होताच संघटनेने कार्यालयाची भेट घेतली व वेतनास विलंब होता कामा नये, अशी भूमिका मांडली. त्यामुळे पंचायत समितीने शिक्षकांच्या वेतनाची लगेच कार्यवाही करून वेतन वेळेवर करून दिले. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती शाखा चिमूरच्या वतीने समाधान व्यक्त केले जात आहे. संघटनेच्या शिष्टमंडळात मधुकर दडमल, नारायण कांबळे, रवी वरखेडे, ताराचंद दडमल, गोविंद गोहणे, योगेश देशमुख, राजू चांदेकर, लक्ष्मण कारेमोरे, कल्पना महाकाळकर, वैशाली डवले आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: Teacher's salary as soon as the allocation is received