शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

अनाथाचे नाथ बनण्यास सरसावले शिक्षकांचे हात

By admin | Updated: January 13, 2017 00:32 IST

हिरापूर येथील शिक्षकांनी अनाथ मुलीला दत्तक घेत तिला आर्थिक मदत केली व सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

निराधार मुलगी : शिक्षणाची जबाबदारी स्वीकारलीआवाळपूर : हिरापूर येथील शिक्षकांनी अनाथ मुलीला दत्तक घेत तिला आर्थिक मदत केली व सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.कोरपना तालुक्यातील हिरापूर जिल्हा परिषद शाळा आयएसओ नामांकण प्राप्त असून नुकताच राष्ट्रवादी आदर्श शिक्षक पुरस्कार येथील मुख्याध्यापक सुधाकर मडावी यांना प्राप्त झाला. त्यामुळे हिरापूर हे गावाला चंद्रपूर जिल्ह्यात व राज्यात नवी ओळख मिळाली आहे. त्यात सामाजिक कार्याची आणखी भर पाडत शिक्षकांनी एका अनाथ मुलीला दत्तक घेऊन तिच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. हिरापूर येथील मजूर शेतकरी उत्तम सिडाम यांच्या घरची परिस्थिती तशी बेताची. पण घरी कन्यारत्न (स्नेहा) आल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. जन्मजात बाळकडू साहित्याने मुलगी हुशार होती. ती शिकू लागली. माध्यमिक शिक्षण घेत असताना दुर्गम आजाराने वडीलाचे निधन झाले आणि वडीलांचे छत्र हरपले. परंतु या परिस्थितीत न डगमगता अडचणींवर मात करीत तिने शिक्षण सुरु ठेवले. दहावीची परीक्षा तिने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. मात्र आर्थिक परिस्थिती हलाकीची असताना आजच्या महागाईच्या काळात शिक्षण कसे घ्यायचे, याचा तिला प्रश्न पडला आणि तिने मोल मजुरी करुन पोटाची खडगी भरण्यास सुरुवात केली. मात्र शिक्षणाचा ध्यास सुटला नव्हता. आर्थिक परिस्थितीने शिक्षण थांबणार अशी स्थिती होती. मात्र ही बाब हिरापूर येथील शिक्षकांना माहित होताच त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी त्या मुलीला दत्तक घेवून तिच्या उर्वरीत शिक्षणाचा खर्च उचलण्याचे जाहीर केले आहे. सेवानिवृत्त शिक्षक वाघमारे यांनी सुद्धा त्या मुलीला कोणत्याही परिस्थितीत मदत करुन शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे. इतरांनीही अशाच निराधारांना आधार देण्याची गरज आहे. (वार्ताहर)