रक्तदान करून शिक्षकांनी पार पाडली सामाजिक जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:26+5:302021-01-13T05:12:26+5:30
चंद्रपूर : येथील पुरोगामी शिक्षक संघटनेद्वारे रक्तदान शिबिर तसेच कोरोना योद्ध्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील ...

रक्तदान करून शिक्षकांनी पार पाडली सामाजिक जबाबदारी
चंद्रपूर : येथील पुरोगामी शिक्षक संघटनेद्वारे रक्तदान शिबिर तसेच कोरोना योद्ध्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील तब्बल ७० शिक्षकांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.
शिबिराचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी राज्य नेते विजय भोगेकर, प्रमुख अतिथी म्हणून राज्याध्यक्ष महिला मंच अलका ठाकरे, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, जिल्हा नेते दीपक वरहेकर, जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता इटनकर, माजी अध्यक्ष नारायण कोटकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी जि.प. अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य देवराव भोंगळे, सामाजिक कार्यकर्ते डी. के. आरीकर माजी उपमहापौर तथा नगरसेवक अनिल फुलझेले आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी जिल्ह्यातील शंभर शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात कोविड योद्धा पुरस्कार देण्यात आला. जिल्हाभरातील दोन हजार शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. मागील वर्षात सेवानिवृत्त झालेल्या ३२ शिक्षकांचा तसेच जिल्हा पुरस्कारप्राप्त ६ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. संचालन एकता बंडावार, लोमेश येलमुले, प्रास्ताविक निखिल तांबोळी, आभार नारायण कांबळे यांनी मानले. प्रेरणागीत ज्योती गावंडे, मंजूषा मानलवार, शारदा कंचर्लावार यांनी सादर केले. यावेळी पंधराही तालुक्यातील शेकडो पुरोगामी शिक्षक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.