शिक्षकांची एकस्तरनुसार वेतन निश्चिती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:31 IST2019-03-22T22:31:23+5:302019-03-22T22:31:44+5:30

सातवा वेतन आयोग लागण्यापूर्वी चिमूर तालुक्यातील शिक्षकांना एकस्तर लागू करून त्यानुसार वेतन निश्चिती करुन प्रोत्साहनपर भत्ता लागू करावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीतर्फे शिक्षणाधिकारी चंद्रपूर संवर्ग विकास अधिकारी, चिमूर व गटशिक्षणाधिकारी चिमूर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

The teacher should fix the salary according to the level of teachers | शिक्षकांची एकस्तरनुसार वेतन निश्चिती करावी

शिक्षकांची एकस्तरनुसार वेतन निश्चिती करावी

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : सातवा वेतन आयोग लागण्यापूर्वी चिमूर तालुक्यातील शिक्षकांना एकस्तर लागू करून त्यानुसार वेतन निश्चिती करुन प्रोत्साहनपर भत्ता लागू करावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीतर्फे शिक्षणाधिकारी चंद्रपूर संवर्ग विकास अधिकारी, चिमूर व गटशिक्षणाधिकारी चिमूर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
शासन निर्णय ६ आॅगस्ट २००२ नुसार आदिवासी, नक्षलग्रस्त क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एकस्तरचा लाभ देय आहे. संघटना मागील एक वर्षांपासून आदिवासी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही सदर लाभ मिळावा याकरिता अनेकदा निवेदने दिले. दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी २१ फेब्रुवारीला सर्व पंचायत समितीला पत्र देऊन एकस्तर व प्रोत्साहन भत्याचे लाभ देण्यात यावे, असे सांगितले आहे. त्यानुसार भत्ता देण्यात यावा, निवारण सभा घेण्यात यावी, रजा, प्रवास सवलत मंजुरी आदेश देण्यात यावे, वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करून तफावत अदा करावी, सहावे वेतन आयोग, थकीत हप्ते जमा करावे, शिक्षकांकडून लिपिकांचे कामे करून घेऊ नये आदी मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी समितीचे नारायण कांबळे, नरेंद्र मुंगले, गोविंद गोहणे, ताराचंद दडमल, रवी वरखेडे, सलीम तुरके, जनार्दन केदार, मुरलीधर नन्नावरे, सरोज चौधरी, परीक्षित ताकसांडे, सचिन शेरकी आदी उपस्थित होते.

शिक्षकाच्या एकस्तर वेतन निश्चित करण्याबाबतचे काम सुरू आहे. संबंधित लिपिकांना शिक्षकांकडून २५ मार्चपर्यंत विकल्प मागवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-किशोर पिसे
गट शिक्षणाधिकारी पं. स. चिमूर

पंचायत समितीने २००२ च्या शासन निर्णयानुसार एकस्तर बाबत वेतन निश्चित करून एकस्तर व प्रोत्साहन भत्ता शिक्षकांना त्वरित द्यावे.
-गोविंद गोहणे
पुरोगामी शिक्षक समिती चिमूर

Web Title: The teacher should fix the salary according to the level of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.