शिक्षक हा समाजाचा खरा कणा आहे

By Admin | Updated: April 9, 2016 01:19 IST2016-04-09T01:19:23+5:302016-04-09T01:19:23+5:30

शिक्षक हा समाजाचा खरा कणा असून ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे पवित्र कार्य शिक्षकाकडूनच होत आहे.

The teacher is the real circle of society | शिक्षक हा समाजाचा खरा कणा आहे

शिक्षक हा समाजाचा खरा कणा आहे

महेंद्र कल्याणकर : गोंडपिंपरीत शैक्षणिक परिसंवाद कार्यक्रम
गोंडपिपरी : शिक्षक हा समाजाचा खरा कणा असून ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे पवित्र कार्य शिक्षकाकडूनच होत आहे. विद्यार्थ्याचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांमध्ये अनेक कौशल्य व सुप्त गुण भरलेले असतात. याचेच आदान प्रदान होण्याकरिता मिशन नवचेतना अभियान असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले.
गोंडपिंपरी येथील स्थानिक खैरे कुणबी सभागृहात गुरूवारी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखेच्या वतीने आयोजित शैक्षणिक परिसंवाद कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी जि.प. शिक्षण व बांधकाम सभापती देवराव भोंगळे होते. पुरोगामी शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय भोगेकर, जि.प. सदस्य संतोष कुंभरे, संवर्ग विकास अधिकारी यशवंत मोहीतकर, उपशिक्षणाधिकारी धनपाल फटींग, गटशिक्षणाधिकारी बल्लारपूर संजय हेडाऊ, भाऊराव देवतळे, युनिसेफ जिल्हा समन्वयक मयुर पुजारी व पुरोगामी समिती जिल्हा सरचिटणीस हरीश ससनकर, दीपक वरेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी शिक्षण क्षेत्रात मिशन नवचेतनांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन लोमेश येलमुले यांनी केले. प्रास्ताविक विजय भोगेकर तर आभार पुरोगामी समितीचे तालुकाध्यक्ष गुरूदेव बाबनवाडे यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान जि.प. शाळा लिखितवाडाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून सुत्र संचालनातून करून उपस्थितांची मने जिंकली. या परिसंवादाला तालुक्यातील शिक्षकांची मोठी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The teacher is the real circle of society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.