भूलथापा देऊन मताधिक्य मिळविणाऱ्या पक्षांना धडा शिकवा
By Admin | Updated: August 5, 2014 23:42 IST2014-08-05T23:42:42+5:302014-08-05T23:42:42+5:30
लोकसभा निवडणुकीत सोशल मिडियाद्वारे युवकांचे भाग्य बदलवू देशातील शेतकरी, कामगार, मजूरवर्ग व गृहिणींच्या समस्या जातीने सोडवून ‘अच्छे दिन’ आणण्याचे खोटे दावे करणाऱ्या

भूलथापा देऊन मताधिक्य मिळविणाऱ्या पक्षांना धडा शिकवा
गोंडपिंंपरी/ब्रह्मपुरी : लोकसभा निवडणुकीत सोशल मिडियाद्वारे युवकांचे भाग्य बदलवू देशातील शेतकरी, कामगार, मजूरवर्ग व गृहिणींच्या समस्या जातीने सोडवून ‘अच्छे दिन’ आणण्याचे खोटे दावे करणाऱ्या भाजप व युती पक्षाने देशातील जनतेचा भ्रमनिराश केला असून अशा खोट्या भुलथापाा देणाऱ्या पक्षांना आगामी निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले. ते गोंडपिंपरी येथील कन्यका सभागृहात रायुकाँ युवा संवाद अभियानांतर्गत आयोजित युवक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
याप्रसंगी राकाँ जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनुराधा जोशी, जिल्हा परिषद कृषी सभापती अरुण निमजे, युवक प्रदेश उपाध्यक्ष वर्र्षा श्यामकुळे, रायुकाँ जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार, माजी आमदार सुदर्शन निमकर, मुनाज शेख, रायुकाँ जिल्हा उपाध्यक्ष ताजणे, राजीव कक्कड, चेतन राजकारणे, तालुका अध्यक्ष सुनील झाडे, माधुरी येलेकर, रायुकाँ तालुका अध्यक्ष सुुनील फुकट, विद्याार्थी अध्यक्ष सुरज माडूरवार, नितेश मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मतदार संघातील समस्या मांडल्या. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
ब्रह्मपुरीतही मेळावा
मंगळवारी दुपारी युवा संसद अभियानांतर्गत ब्रह्मपुरीमध्येही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी राकाँचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य होते. आमदार उमेश पाटील म्हणाले, लोकसभेत देशातील जनतेला केवळ स्वप्ने दाखवून सत्ता काबीज केली. लोकांची शुद्ध फसवणूक भाजपाने केली आहे. महाराष्ट्रात ते पुन्हा सत्तेची स्वप्न पाहत आहेत. परंतु महाराष्ट्रातील जनता याची स्वप्ने उधळून लावतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विधानसभेची निवडणूक तयारीपूर्वी युवकांचे संवाद अभियान कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उमेश पाटील यांनी मिडियानी केलेला प्रचार, सोशल मिडियाचा वापर, मोबाईल संदेशचा उपयोग करुन जनतेला भूलथापा देऊन भाजपाने सत्ता काबीज केल्याचा आरोप भाषणातून केला. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, मोरेश्वर टेंमुर्डे, राजेंद्र वैद्य आदींनी मनोगत व्यक्त केले. संचालन दामोधर मिसार, उद्धवराव शिंगाडे, अरुण निमजे, गाडेवार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)