‘त्या’ आजीकडे सर्वांच्याच नजरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:40+5:302021-01-19T04:29:40+5:30
चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीतून गावागावांत लोकशाहीचा उत्सव बघायला मिळाला. तरुणांपासून ते वयोवृध्दांपर्यंत उमेदवार या निवडणूक रिंगणात होते. काहींचा ...

‘त्या’ आजीकडे सर्वांच्याच नजरा!
चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीतून गावागावांत लोकशाहीचा उत्सव बघायला मिळाला. तरुणांपासून ते वयोवृध्दांपर्यंत उमेदवार या निवडणूक रिंगणात होते. काहींचा विजय झाला, तर काहींना पराजयाला सामोरे जावे लागले. ग्रामविकासाचे स्वप्न पुढे ठेवून अनेकांनी निवडणूक लढविली. मात्र चंद्रपूर शहराशेजारी असलेल्या लोहारा येथील एका आजीने निवडणूक लढविली. एवढेच नाही, तर त्या गावातून सर्वाधिक मतानी निवडूनही आल्या. विजयाची घोषणा झाल्यानंतर या आजीचा उत्साह गगनात मावेनासा झाल्याचे बघायला मिळाले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळपासून निवडणूक निकाल ऐकण्यासाठी गर्दी झाली होती. यामध्ये बहुतांश तरुणांचाच अधिक सहभाग होता. एक एक ग्रामपंचायत करीत निवडणूक निर्णय अधिकारी निकालाची घोषणा करीत होते, तसतसा उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांचा उत्साह वाढत होता. याचवेळी लोहारा येथील ग्रामपंचायत निकालाची घोषणा झाली. सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले असतानाच एका ६० ते ६५ वर्षांच्या आजीचाही विजय झाल्याचे घोषित होताच त्या आजीचा उत्साह बघण्यासारखा होता. विजयासंदर्भात विचारले असता, गावाच्या विकासासाठी आपण निवडणूक लढिवली असून, २१० मतांनी विजयी झाल्याचेही त्यांनी सांगितले.