विशेष पथकाकडून ३९ लाखांची करवसुली
By Admin | Updated: March 17, 2017 00:54 IST2017-03-17T00:54:49+5:302017-03-17T00:54:49+5:30
येथील नगर पंचायतीतर्फे सन २०१५-१६ या वर्षाची थकबाकी मालमत्ता कर व व्यावसायीक गाळे

विशेष पथकाकडून ३९ लाखांची करवसुली
सिंदेवाही नगरपंचायत : कर भरण्याचे आवाहन
सिंदेवाही : येथील नगर पंचायतीतर्फे सन २०१५-१६ या वर्षाची थकबाकी मालमत्ता कर व व्यावसायीक गाळे किराया वसुली करण्यासाठी विशेष पथक गठित करण्यात आले होते. या पथकाने ३९ लाख ५९ हजार रुपयाची कर वसुली केली आहे.
नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी विलास कागदेलवार व अधीक्षक भास्कर निकुरे यांच्या नेतृत्वात विशेष कर वसुली मोहिम राबविण्यात येत आहे. स्थानिक नगर पंचायत अंतर्गत मालमत्ता कर, गाळे किराया व पाणीपट्टी कराची थकबाकी लाखो रुपये होती. त्यामुळे नगरातील विकास कामांना निधी उपलब्ध होत नव्हता. सर्वप्रथम कर वसुली संदर्भात थकबाकीदारांना वसुलीसाठी लेखी सुचना देण्यात आल्या. तरीही कराची वसुली होत नव्हती. त्यामुळे नगर पंचायतने विशेष कर वसुली व जप्ती मोहिम राबविली.
या मोहिमेअंतर्गत ९ व्यावसायीक दुकानांना सील लावून जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे सिंदेवाही नगरातील मालमत्ता, गृहकर २० लाख ३८ हजार रुपये, दिवाबत्ती कर १ लाख ६१ हजार, आरोग्य कर १ लाख ५७ हजार, सामान्य पाणीपट्टी कर ३ लाख ४१ हजार, गाळे भाडे १ लाख ६६ हजार, विशेष पाणी पट्टीकर १० लाख ९३ हजार मिळून एकुण ३९ लाख ५९ हजार रुपयाची कर वसुली करण्यात आली. विशेष मोहिमेद्वारे जप्तीची कार्यवाही सुरू केल्यामुळे थकबाकी असलेले मालमत्ता व व्यावसायीक दुकानदारांनी रोख तथा धनादेशाच्या स्वरुपात पथकाच्या दंडासहीत मालमत्ता कराचा भरणा केला. ३० मार्च २०१७ पर्यंत नागरिकांनी थकीत मागील व यावर्षीच्या कराचा भरणा नगर पंचायत कार्यालयात जमा करावे अन्यथा थकीत रक्कमेसह वृत्तपत्रात व नगरामध्ये ध्वनीक्षेपकाद्वारे तसेच चौका-चौका बोर्ड लावून थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केले जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे. (पालक प्रतिनिधी)