भरधाव टाटा सुमोने तोडले ट्रॅफिक सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:29 IST2021-04-01T04:29:08+5:302021-04-01T04:29:08+5:30
मूल : येथील गाांधी चौकात रात्री १ वाजताच्या सुमारास चिमूरवरून चंद्रपूरला जात असलेल्या टाटा सुमोच्या वाहन चालकाचे नियंत्रण ...

भरधाव टाटा सुमोने तोडले ट्रॅफिक सिग्नल
मूल : येथील गाांधी चौकात रात्री १ वाजताच्या सुमारास चिमूरवरून चंद्रपूरला जात असलेल्या टाटा सुमोच्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने गांधी चौकातील चहा टपरी, ट्रॅफिक सिग्नलला टाटा सुमोची धडक बसली. सिग्नल तुटून खाली पडले.
एक मद्यधुंद चालक टाटा सुुमोने (क्रमांक एमएच ३१- एफए ३०१५) भरधाव जात होता. अचानक त्याचे गाडीवरून नियंत्रण सुटले. गांधी चौकात उमेश चेपूरवार यांच्या मालकीच्या उभी असलेल्या गाडीला सुमोची धडक बसली. यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच गांधी चौकात असलेल्या दिगांबर दुम्मेवार यांच्या चहा टपरीचेही नुकसान झाले. त्यानंतर सुमोने ट्रॅफिक सिग्नललाही धडक दिल्याने ते तुटून पडले. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. चालकाला मूल पोलिसांनी ताब्यात घेतले असून कलम ४१ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.