तरूणाईने समाजाभिमुख व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:45 IST2018-12-26T22:44:44+5:302018-12-26T22:45:00+5:30
युवक-युवतींमध्ये प्रचंड क्षमता असते. या क्षमतेचा योग्य वापर केल्यास अनेक चांगली कामे होऊ शकतात. यासाठी समाजाभिमुख होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. राणी बंग यांनी केले. यादवराव धोटे महाविद्यालयात त्या बोलत होत्या.

तरूणाईने समाजाभिमुख व्हावे
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : युवक-युवतींमध्ये प्रचंड क्षमता असते. या क्षमतेचा योग्य वापर केल्यास अनेक चांगली कामे होऊ शकतात. यासाठी समाजाभिमुख होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. राणी बंग यांनी केले. यादवराव धोटे महाविद्यालयात त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार अॅड. संजय धोटे, संस्थाध्यक्ष सुधीर धोटे, सुनंदा खोरगडे, राजेंद्र इसासरे, ज्ञानेश्वर पाटील, सतीश धोटे, अॅड. अर्पित धोटे, उपस्थित होते. यावेळी डॉ. राणी बंग यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना बोलते केले. प्रास्ताविक प्राचार्य दुर्योधन संचालन प्रा. रेणुका देशकर यांनी केले. आभार अल्पना कवाडे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.