गोवरी परिसरात तापाची साथ
By Admin | Updated: September 9, 2014 23:23 IST2014-09-09T23:23:20+5:302014-09-09T23:23:20+5:30
राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरात मलेरियासदृश तापाची साथ सुरू आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना शहराच्या ठिकाणी जाऊन उपचार करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

गोवरी परिसरात तापाची साथ
हरदोना : राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरात मलेरियासदृश तापाची साथ सुरू आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना शहराच्या ठिकाणी जाऊन उपचार करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गोवरी परिसरातील पोवनी, चिंचोली (खुर्द), माथरा, अंतरगाव, निंबाळा, साखरी, बााबापूरर, मानोली परिसरातील मलेरियासदृश तापाने थैमान घातले आहे. एका कुटुंबातील तीन ते चार सदस्यांना तापाने ग्रासले आहे. या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली (बु.) येथे आहे. मात्र ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा बोजवारा आहे. त्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव खासगी दवाखान्याचा आाधार घ्यावा लागत आहे. आर्थिक भुर्दंड सहन करीत रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक गावात फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करणे आवश्यक असते. परंतु प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षाने गावात धूर फवारणी केली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. परिसरातील बहुसंख्य गावात तापाने कहर केला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यल्प सुविधा आहे. त्यातही डॉक्टर मिळेल याची शास्वती नाही. त्यामुळे अनेक नागरिक शहरातील रुग्णालयात धाव घेत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. अनेक गावात ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे.
आरोग्य विभागाने गोवरी परिसरातील गावात आरोग्य शिबिर लावून नागरिकांची तपासणी करावी, तसेच स्वच्छता मोहीम राबवावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)