तंटामुक्ती अध्यक्षासाठी पुरस्कारप्राप्त गावातच तंटे

By Admin | Updated: August 21, 2015 01:39 IST2015-08-21T01:39:31+5:302015-08-21T01:39:31+5:30

नांदा ग्रामपंचायतीची आमसभा नागरिकांच्या आपसी मतभेदातच पार पडली. यात तंटामुक्ती अध्यक्षाच्या निवडीसाठी चांगलेच वादंग माजले असून तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी पूर्ण मतदान घ्यावे,....

Tantamukta presents the award in the village | तंटामुक्ती अध्यक्षासाठी पुरस्कारप्राप्त गावातच तंटे

तंटामुक्ती अध्यक्षासाठी पुरस्कारप्राप्त गावातच तंटे


नांदाफाटा: नांदा ग्रामपंचायतीची आमसभा नागरिकांच्या आपसी मतभेदातच पार पडली. यात तंटामुक्ती अध्यक्षाच्या निवडीसाठी चांगलेच वादंग माजले असून तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी पूर्ण मतदान घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी कोरपना तथा मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.
आमसभेत अध्यक्ष पदासाठी भास्कर लोहबडे आणि वसंत बोढाले यांचे नामांकन आले. यात लोहबडे यांची अध्यक्षपदासाठी वर्णी लागली. मात्र येथील ग्रामविस्तार अधिकारी सुरेश वाढई यांनी मतदारांची योग्य मोजणी न करताच लोहबडे यांना अध्यक्षपदासाठी घोषित केल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे. त्याचबरोबर तंटामुक्त समितीच्या सदर सदस्यांची नेमणूक न करताच अध्यक्षपद घोषित केले आहे. यामध्ये निवडणूकीपूर्वी पूर्वनियोजीत बेत आखून नेमणूक करण्यात आल्याचा आरोप ग्रामविस्तार अधिकाऱ्यांवर केला जात आहे. लोहबडे यांच्या बाजूला कमी आवाजी मतदान असताना बोढाले यांच्याकडील अर्धवट मोजणी करुन अध्यक्षपद घोषित केल्याचे समजते.
या घटनेमुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापत असून प्रकरण पोलिसात गेले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून स्वस्त धान्य दुकान, विजेचे खांब, अंगणवाडी बांधकाम, साहित्य खरेदी रोपवाटिका आदी कारणांवरुन ग्रामपंचायतीत वादंग निर्माण झाले आहे. अशातच आता तंटामुक्ती अध्यक्षपदाचा वाद चव्हाट्यावर आला असून येथील आरटीई कार्यकर्ते अभय मुनोत, हारुण सिद्दीकी, उपसरपंच बंडू वरारकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष वसंत बोढाले आदींनी अध्यक्षाच्या निवडीसाठी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे मतदान घेण्याची मागणी केली आहे. पुढे काय होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Tantamukta presents the award in the village