तालुकास्तरीय विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:42 IST2020-12-16T04:42:42+5:302020-12-16T04:42:42+5:30

अध्यक्षस्थानी बामसेफचे प्रा. भारत मेश्राम होते. प्रमुख अतिथी नगरसेवक प्रा .युनूस शेख ,नगर पत्रकार संघाचे विलास धुळेवार, बहुजन समाज ...

Taluka level student award distribution ceremony | तालुकास्तरीय विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा

तालुकास्तरीय विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा

अध्यक्षस्थानी बामसेफचे प्रा. भारत मेश्राम होते. प्रमुख अतिथी नगरसेवक प्रा .युनूस शेख ,नगर पत्रकार संघाचे विलास धुळेवार, बहुजन समाज पार्टीचे नंदु खोब्रागडे व युवा सामाजिक ब्रिगेडचे अमोल निनावे उपस्थित होते.

तालुकास्तरीय संविधान परीक्षेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या भारत विद्यालय नवरगावचा विद्यार्थी संघर्ष चंद्रप्रकाश चहांदे, प्राजक्ता विद्यामंदिर सिंदेवाहीचा तेजस भूपेश पिसे व महात्मा फुले विद्यालय सिंदेवाहीची विद्यार्थिनी वणश्री प्रभु रन्दये यांना गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाहीची विद्यार्थिनी सरोज संतोष लोखंडे, सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाहीची केजुषा संतोष लोखंडे व सिताबाई शेंडे विद्यालय सिंदेवाहीची रूचिता प्रमोद भेंडाले यांचा सत्कार करण्यात आला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय विजेते महात्मा फूले विद्यालय सिंदेवाहीचा हिमांशू प्रभु रन्दये, प्राजक्ता विद्यामंदिर सिंदेवाहीची दिशा बारिकराव खोब्रागडे व विश्वज्योती स्कूलची समता भारत मेश्राम यांना गौरविण्यात आली. चित्रकला स्पर्धेत विश्वज्योती स्कूलची अवनी भारत मेश्राम, देवयानी स्कूल सिंदेवाहीची तनिष्का सुरेश खोब्रागडे व यशराज इंग्लिश स्कुलचा वाजीद वहाब अली अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक प्रा. भारत मेश्राम, संचालन विद्यार्थी संघर्ष चहांदे तर शिक्षक बारीकराव खोब्रागडे यांनी आभार मानले.

Web Title: Taluka level student award distribution ceremony