प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकास्तरीय अधिवेशन
By Admin | Updated: March 8, 2015 00:41 IST2015-03-08T00:41:15+5:302015-03-08T00:41:15+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे चंद्रपूर तालुकास्तरीय अधिवेशन नुकतेच जटपुरा कन्या शाळेत पार पडले. अधिवेशनाचे उद्घाटन संघटनेचे जिल्हा नेते जी.जी. धोटे यांच्या हस्ते झाले.

प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकास्तरीय अधिवेशन
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे चंद्रपूर तालुकास्तरीय अधिवेशन नुकतेच जटपुरा कन्या शाळेत पार पडले. अधिवेशनाचे उद्घाटन संघटनेचे जिल्हा नेते जी.जी. धोटे यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार वेल्हेकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सरचिटणीस जे.डी. पोटे, धनंजय मोडक, दादा राऊत, सुनिल गेडाम, अनिल नाट, विद्या सयाम, सुचिता काळे, सुनंदा गजभिये आदींची उपस्थिती होती.
या अधिवेशनात तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बऱ्याच समस्या प्रलंबित असल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यामध्ये प्रामुख्याने मासिक वेतनाला विलंब, सेवापुस्तके अद्ययावत नसणे, दुय्यम सेवा पुस्तके भरण्यासाठी पंचायत समितीची टाळाटाळ, गणवेशाचे पैसे न मिळणे, शालेय पोषण आहाराचे मानधन वेळेवर न मिळणे, बी.पी.एल. विद्यार्थ्यांचा उपस्थिती भत्ता न मिळणे, सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते, भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा न करणे, वरिष्ठ श्रेणीची जिल्हा परिषदेकडून परत आलेल्या प्रस्तावावर कारवाई करणे, आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उद्घाटनपर भाषणात जी.जी. धोटे यांनी शिक्षकांच्या समस्या निकाली काढणारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक . शिक्षण संघ ही राज्यातील एकमेव संघटना असल्याचे सांगून शिक्षण समितीच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर प्रास्ताविकातून जे.डी. पोटे यांनी तालुका तसेच जिल्हास्तरावरावील समस्यांना संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करुन निकाली काढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
यावेळी वेल्हेकर यांनी मार्गदर्शन केले. संचालन प्रशांत कंडे, आभार संतोष आत्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी लता मत्ते, उज्वला कुलकर्णी, चित्रा भोयर, संजय मेश्राम, प्रमोद बावीसकर, भावना जिडगलवार, नरेश बोमेवार, पौर्णिमा रेवतकर, निर्माला गोऱ्हाडे, शीला बोबाटे, वंदना दवने, वसंता जोगी, निला खापणे, निर्मला सहारे, कल्पना जव्हेरी, निरंजना पोटे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)