महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:32 IST2021-08-19T04:32:09+5:302021-08-19T04:32:09+5:30
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)- उत्कृष्ट घरकुल प्रथम पुरस्कार आष्टाचे दिवाकर दामोदर शेंडे, द्वितीय तिरवंजा (मो.)चे गणपत श्रीहरी कारेकर, तृतीय ...

महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार वितरण
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)- उत्कृष्ट घरकुल
प्रथम पुरस्कार आष्टाचे दिवाकर दामोदर शेंडे, द्वितीय तिरवंजा (मो.)चे गणपत श्रीहरी कारेकर, तृतीय आष्टाचे विजय रामचंद्र पेटकुले, राज्य पुरस्कृत आवास योजना (ग्रामीण)चा उत्कृष्ट घरकुल प्रथम पुरस्कार चंदनखेडाचे श्रीधर रामजी जांभुळे, द्वितीय मानोरा सिंचे रूपेश कवडू ढोके, तृतीय टाकळीच्या संगीता नागो चंदनवार, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) चे उत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम पुरस्कार मोहबाळा, द्वितीय पुरस्कार कुचना व तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत, काटवल तु.चे सरपंच व सचिव यांचा गौरव करण्यात आला.
राज्य पुरस्कृत आवास योजना (ग्रामीण) – उत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार वडाळा तु., द्वितीय आष्टा, तृतीय पुरस्कार मानोरा ग्रामपंचायतीला मिळाला. येथील सरपंच व सचिव यांचा गौरव करण्यात आला.
पात्र घरकुल लाभार्थींना बांधकामाकरिता शासनाकडून मोफत जागा उपलब्ध करून दिल्याबाबत भटाळीचे सरपंच सुधाकर पोईनकर व सचिव जोगी, चंदनखेडाचे सरपंच नयन जांभुळे व सचिव नाईकवार यांना विशेष परिश्रम व शासन दरबारी पाठपुरावा केल्याबद्दल गौरविण्यात आले. आष्टा येथील महिला शक्ती ग्राम संघातील महिलांना महाराष्ट्रातील पहिले घरकुल मार्ट उभारून लाभार्थींना घरकुलाकरिता लागणारे साहित्य पुरविले. यासाठी ग्रामसंघाचे अध्यक्ष उषा शेंडे व इतर महिला यांचा गौरव करण्यात आला.
180821\save_20210818_170901.jpg
फोटो