जुन्या इमारती झाल्या तळीरामांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:51+5:30

शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील गजानन नगरी परिसरातील जुन्या इमारती व ले-आऊटच्या आजुबाजूला नागरिकांची घरे आहेत. या मोकळ्या जागेचा गैरफायदा घेऊन अनेक तळीराम मध्यरात्रीपर्यंत मनसोक्त दारू ढोसून धुमाकूळ घालतात. हा प्रकार काही दिवसांपासून वाढतच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर निघणे कठीण झाले.

Taliram's haunt of old buildings | जुन्या इमारती झाल्या तळीरामांचा अड्डा

जुन्या इमारती झाल्या तळीरामांचा अड्डा

ठळक मुद्देकारवाईची मागणी : मध्यरात्रीपर्यंत सुरू असतो धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : येथील प्रभाग क्रमांक दोनमधील गजानन नगरी परिसरातील जुन्या इमारती व ले-आऊटमध्ये काही दिवसांपासून अवैध व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे या व्यवसायांना पोलीस व स्थानिक प्रशासनाने तात्काळ आळा घालण्याची मागणी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर खुटेमाटे व नागरिकांनी केली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील गजानन नगरी परिसरातील जुन्या इमारती व ले-आऊटच्या आजुबाजूला नागरिकांची घरे आहेत. या मोकळ्या जागेचा गैरफायदा घेऊन अनेक तळीराम मध्यरात्रीपर्यंत मनसोक्त दारू ढोसून धुमाकूळ घालतात. हा प्रकार काही दिवसांपासून वाढतच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर निघणे कठीण झाले. सामाजिक स्वास्थ बिघडले. युवक सिगारेटचे झुरके घेत दिवस-रात्र डेरा जमवून राहतात. ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास देतात. मद्यधुंद युवक अश्लील शिवीगाळ करीत असल्याने महिला हैराण झाल्या आहेत.

मोकळ्या जागांवरही पोलिसांचा ‘वॉच’ हवा
शहरातील गजानन नगरी, तालुका क्रीडा संकुल, मोकळे लेआउट, हातलोणी मार्ग, जेवरा जंगल टेकडी भागात रात्रीच्या वेळी युवकांचा धुमाकूळ सुरू असतो. सामाजिक स्वास्थ बिघडविणारे गैरकृत्य वाढतच आहेत. त्यामुळे पोलिसांनी मोकळा जागांवर वॉच ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Taliram's haunt of old buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.