तलाठी कार्यालयाच्या इमारतीला मुहूर्त सापडेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST2021-07-02T04:20:10+5:302021-07-02T04:20:10+5:30

लाखो रुपयांची वास्तू धूळ खात, तलाठी कार्यालय भाड्याच्या खोलीत... ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील सात हजार लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव भो. ...

Talathi office building could not find a moment! | तलाठी कार्यालयाच्या इमारतीला मुहूर्त सापडेना !

तलाठी कार्यालयाच्या इमारतीला मुहूर्त सापडेना !

लाखो रुपयांची वास्तू धूळ खात, तलाठी कार्यालय भाड्याच्या खोलीत...

ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील सात हजार लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव भो. येथे दहा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून तलाठी कार्यालयाची इमारत बांधण्यात आली. मात्र, अद्यापही हे कार्यालय भाड्याच्या खोलीतच आहे. नवीन तलाठी कार्यालयाच्या उद्घाटनाचा मुहूर्त कधी सापडेल, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

पिंपळगाव (भो) येथे दहा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून तलाठी कार्यालयाची मजबूत, सर्व सुविधांयुक्त इमारत बांधकाम पूर्ण झाले. परंतु, या इमारतीचे उद्घाटन अद्यापही झाले नाही. एखाद्या बांधकाम पूर्ण असलेल्या इमारतीचा दहा वर्षे लोटूनही वापर होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तलाठी कार्यालय भाड्याच्या खोलीतच असून, ते गावाच्या एका टोकावर असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

010721\img-20210701-wa0099.jpg

पिंपळगाव(भो)येथील धूळखात असलेली इमारत

Web Title: Talathi office building could not find a moment!