सास्ती साजातील तलाठी बेपत्ता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:34 IST2021-09-09T04:34:58+5:302021-09-09T04:34:58+5:30

साजा कार्यालय धूळखात सास्ती : तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या सास्तीत सास्तीसह कोलगाव, मानोली, बाबापूर, कढोली या पाच गावांचा ...

Talathi disappears in torture? | सास्ती साजातील तलाठी बेपत्ता?

सास्ती साजातील तलाठी बेपत्ता?

साजा कार्यालय धूळखात

सास्ती : तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या सास्तीत सास्तीसह कोलगाव, मानोली, बाबापूर, कढोली या पाच गावांचा समावेश होतो. येथील शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून सास्तीत सज्जाचे कार्यालय दिले. मात्र या सज्जाचे तलाठी हे कार्यालयातून अजूनही गायबच असल्याने नागरिकांना दैनंदिन काम करण्यासाठी अडचण होत आहे.

त्यामुळे हे तलाठी सज्जा कार्यालय सध्या तरी शोभेची वास्तू ठरली असून तलाठी अखेर गेले कुठे, असा प्रश्न सज्जातील पाचही गावांतील नागरिकांना पडला आहे. संबंधित तलाठ्याची येथून हकालपट्टी करावी, यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी अगोदरच मागणी केली असून त्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारही केली आहे. तलाठ्याची हकालपट्टी न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. मात्र वरिष्ठांनी अजूनही याकडे लक्ष दिलेले नाही.

080921\1721-img-20210908-wa0017.jpg

बंद असलेले सास्ती साज्याचे तलाठी कार्यालय

Web Title: Talathi disappears in torture?