अंगणात झोपलेल्या वृद्धेला बिबट्याने नेले उचलून; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 10:01 IST2019-06-07T10:01:37+5:302019-06-07T10:01:58+5:30
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला चढविला असून त्याने एका वृद्धेला आपले शिकार बनवले आहे.

अंगणात झोपलेल्या वृद्धेला बिबट्याने नेले उचलून; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला चढविला असून त्याने एका वृद्धेला आपले शिकार बनवले आहे. स्वराज या नऊ महिन्यांच्या बालकाला ठार केल्यानंतर गडबोरीतीलच गयाबाई पैकू हटकर (६५) या वृद्धेला त्याने ठार केले आहे.
शुक्रवारी पहाटे अंगणात झोपलेल्या या महिलेला त्याने तिच्यावर हल्ला चढवला. पहाटे घरातील मंडळी उठली असता त्यांना गयाबाई बाहेर खाटेवर दिसली नाही. मात्र आजूबाजूला रक्त सांडलेले दिसले. त्यांनी शोध घेतला असता बिबट्याने तिला फरफटत बाजूच्या नर्सरीत नेल्याचे आढळून आले.
या घटनेने गावात खळबळ उडाली असून या बिबट्याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी केली जात आहे.