शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पाच म्हणता दहा घ्या, पण कापूस वेचणीसाठी या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 6:00 AM

जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. मागील दोन वर्षात बोंडअळीने शेतकऱ्यांना त्रस्त केले. यावर कशीबशी मात करीत नाही तोच यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील सततचा पावसामुळे होत्याचे नव्हते झाले.

ठळक मुद्देउत्पादन नाही अन् भावही नाही : कापूस, सोयाबीन व धान उत्पादक सारेच आर्थिक संकटात, नव्या सरकारकडून अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी कापूस उत्पादनाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. शासकीय हमीभाव ५ हजार ५०० रुपये क्विंटल आहे. असे असताना खर्चाची रक्कम बघता यातून कोणताच फायदा शेतकऱ्यांना होत नसून आता तर वेचणीसाठी ५ ते ७ रुपये प्रति किलो दर द्यावे लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कापूस शेतातच पडून राहू नये म्हणून शेतकरी आता वेचणीसाठीही जादा दर देऊन मजुरांकडे साकडे घालत आहेत.जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. मागील दोन वर्षात बोंडअळीने शेतकऱ्यांना त्रस्त केले. यावर कशीबशी मात करीत नाही तोच यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील सततचा पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. वातावरणातील बदलामुळे कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात लाल्या रोग आला. त्यामुळे कपाशीची वाळण्याकडे वाटचाल सुरु आहे. दरम्यान, संपूर्ण कपाशी दोन-तीन वेच्यातच शेतकऱ्यांच्या घरात पोहोचली आहे. एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन होत आहे. कापूस वेचणीची मंजुरी ही ५ ते ७ रुपये प्रती किलोदराने मजुरांना द्यावी लागत आहे.एकरी चार ते पाच क्विंटल कापूस घरी येत असून जेमतेम काही हजार शेतकऱ्यांच्या हातात मिळते. शेतकऱ्यांना आधीच बियाणे, पेरणी किटकनाशक, खत, डवरणी, निंदण यासाठी पैसे खर्च करावे लागते. त्यात कापूस वेचनासाठी मजुर मिळत नाही. कसेबसे मिळावे तर त्यांना ५ ते ७ रुपये पर्यंत प्रति किलो मजुरी द्यावी लागत आहे. शेतकऱ्यांना सहा महिन्याच्या परिश्रमात त्याच्या हाती खर्चा इतपतही पैसे येत नसल्यामुळे वर्षबर कुटुंबाचे पालन-पोषण कसे करायचे, असे प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. आधीच वाढलेले बँकेचे कर्ज, वेळेवरचे खर्च भागविण्यासाठी केलेला हातउसणवारी ती फेडण्यासाठी पुन्हा गावातील सावकारांचे कर्ज अशा विवंचनेत सध्या जिल्ह्यातील शेतकरी अडकला आहे.पावसाचा उत्पादनावर फटकायंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे संकटाचा सामना करावा लागला. अवकाळी पावसाने कपाशीची बोंडे सडल्याने उत्पादनात घट झाली आहे. तर दुसरीकडे सततच्या पावसाने कपाशीची प्रतवारी घसरल्याने बाजारभाव कमी अशी अवस्था झाली आहे. दरवर्षी साधारणत: दसऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या घरी सोयाबिन व कापूस हे नगदी पीक येतात. दिवाळी आनंदात जाते. परंतु यंदा याच काळात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अधिवेशनाकडे शेतकऱ्यांच्या नजराआता राज्यात सत्ता परिवर्तन झाले आहे. महाविकास आघाडीची सत्ता बसली आहे. नव्या सरकारकडून शेतकरी सरसकट कर्जमाफीसाठी आशावादी झाला आहे. विधानसभा निवडणूक प्रचारात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी संकटातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची ग्वाही जाहीरनाम्यात दिली होती. सोमवारपासून नागपुरात नव्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सातबारा कोरा करण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीची घोषणा कधी होते, याकडे मोठ्या आशेने शेतकरी नजरा लावून आहेत. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी आग्रही राहिले होते. आता तर उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या अधिवेशनात ते कर्जमाफीची घोषणा करतील काय, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. विशेष म्हणजे हे अधिवेशन केवळ सहा दिवसच चालणार असे बोलले जात आहे. या सहा दिवसात शेतकऱ्यांना काही मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण झाली आहे.सोयाबीन उत्पादकही अडचणीतयावर्षी अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन फार मोठया प्रमाणात घटले आहे. शेतमालाची प्रतवारी घसरल्याने अत्यल्प भाव मिळत आहे. शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. चार वर्षांपासून शेतकºयांनी कोरडा दुष्काळ अनुभवला. पाऊस नसल्याने शेतीत उत्पादन झाले नाही. यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस चांगला पडल्याने पिकांची वाढ चांगली झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आशा होती. परंतु गत महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अति पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनला कोंब फुटले असून पाण्याने सोयाबीन काळे पडले आहे. सोयाबीन काढणीच्या वेळेसच अति पाऊस आल्याने पिकांची उगवण खुंटली. पिकांचे अतोनात नुकसान झाले. यावर्षी अनेक शेतकऱ्यांना अंदाजे एकरी तीन ते पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. परंतु सोयाबीनची प्रतवारी प्रचंड घसरलेली दिसून येत आहे. सध्या बाजारात मोजके सोयाबीन सोडले, तर बहुतांश शेतकºयांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल दीड हजारापासून ते २७०० रुपये भाव मिळत आहे. शिवाय सोयाबीन ओलसर असल्याने ते वाळवायला टाकण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती