विनापरवाना वाहनातून विद्यार्थ्यांची ने-आण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:03 IST2019-04-24T00:02:44+5:302019-04-24T00:03:40+5:30
घुग्घुस माऊंट कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणारी तीन वाहने विनापरवाना धावत असल्याची धक्कादायक बाब चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी मंगळवारी सकाळी ७ वाजता केलेल्या कारवाईत पुढे आली.

विनापरवाना वाहनातून विद्यार्थ्यांची ने-आण
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : घुग्घुस माऊंट कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणारी तीन वाहने विनापरवाना धावत असल्याची धक्कादायक बाब चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी मंगळवारी सकाळी ७ वाजता केलेल्या कारवाईत पुढे आली.
या तीनही वाहनांवर पांढऱ्या पट्टीवाल्या नंबर प्लेट आढळून आल्या. या वाहनांना विद्यार्थ्यांची ने-आण करण्याचा कुठल्याही प्रकारचा उपप्रादेशिक परिवहन विभागाचा परवाना नसल्याची बाब लक्षात येताच या तीनही वाहनांवर कारवाई करण्यात आली. या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोंबल्यागत बसविण्यात आले होते. ही बाब लक्षात येताच चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी आज सकाळी ७ वाजता स्वत: घुग्घुस गाठले. माऊंट कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणाºया वाहनांना थांबवून त्या वाहनांची तपासणी केली असता तीन वाहने ही अनाधिकृतपणे विद्यार्थ्यांची ने-आण करीत असल्याचे आढळून आले.
पालकांनी मुलांच्या जीवाशी खेळू नये
आपण विद्यार्थ्यांना ज्या वाहनांमध्ये शाळा-महाविद्यालयामध्ये पाठवत आहोत. ताय वाहनांना विद्यार्थ्यांची ने-आण करण्याची परवानगी आहे वा नाही याची शहानिशा करावी. वाहन चालकांनी नियम पाळले नाही तर तक्रारी दाखल करावी. परवाना नसेल तर अशा वाहनांमध्ये मुलांना पाठवून त्यांच्या जिवाशी खेळू नका, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी सदर कारवाईनंतर ‘लोकमत’शी बोलताना केले.