देशद्रोह्यांंवर कठोर कारवाई करा

By Admin | Updated: February 26, 2016 01:06 IST2016-02-26T01:06:59+5:302016-02-26T01:06:59+5:30

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या झालेल्या कार्यक्रमात देशाविरुद्ध घोषणा देणारा उमर खालिद व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध ...

Take strong action against the treasonists | देशद्रोह्यांंवर कठोर कारवाई करा

देशद्रोह्यांंवर कठोर कारवाई करा

भाजपाचे निवेदन : विद्यापीठाच्या कार्यक्रमात घोषणा देण्याचे प्रकरण
ब्रह्मपुरी : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या झालेल्या कार्यक्रमात देशाविरुद्ध घोषणा देणारा उमर खालिद व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध देशद्रोहाची कारवाई करण्याची मागणी येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात भाजपाच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या उपकुलपतीचा आणि स्वायत्त मंडळाचा या घटनेला पूर्ण पाठिंबा असून ते देश विरोधी कारवाई करण्यासाठी मदत करीत आहेत. त्यामुळे उपकुल सचिव व स्वायत्त मंडळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. देशात असलेल्या प्रत्येक विद्यापीठाला केंद्र शासनाने अशा प्रकारच्या देश विघातक कृत्य करणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्यात यावी. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला देण्यात आलेला विशेष दर्जा रद्द करण्यात यावा, उमर खालीद व त्याच्या सहकाऱ्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात ब्रह्मपुरी विधानसभा प्रमुख प्रा. कादर शेख, तालुका प्रमुख दीपक उराडे, शहर प्रमुख जगदीश तलमले, नगराध्यक्षा रिता उराडे, महासचिव परेश शहादाणी, क्रिष्णा सहारे, नानाजी तुपट, नगरसेवक मनोज भूपाल, अतुल गौरशेट्टीवार, छाया वानखेडे, अनघा दंडवते, डॉ. हेमलता नंदूरकर, स्वर्णलता बडोले, रामलाल दोनाडकर, विनोद ठाकरे, कलामभाई शेख व इतर अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Take strong action against the treasonists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.