जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करा
By Admin | Updated: July 29, 2015 00:56 IST2015-07-29T00:56:02+5:302015-07-29T00:56:02+5:30
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे तसेच श्रीशिव प्रतिष्ठान हिंदुस्थानेच संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी

जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करा
वरखडे यांची मागणी : शासनाला निवेदन
वरोरा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे तसेच श्रीशिव प्रतिष्ठान हिंदुस्थानेच संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांना सांगली येथील सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अपमानित भाषेत बोलल्याबद्दल त्यांच्यावर कार्यवाही कठोर करण्याची मागणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तथा वरोरा न.प.चे नगरसेवक अनिल वरखडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
सांगली येथे आयोजित शिव सन्मान परिषदेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराव भिडे व बाबासाहेब पुरंदरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करुन त्यांचा अपमान केला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन ‘जाणता राजा’ पोहोचविला तर संभाजीराव भिडे यांनी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानची स्थापना करुन या माध्यमातून राजे शिवछत्रपतींच्या मार्गावर चालणारे देशभक्त घराघरात निर्माण करीत आहेत. हिंदू धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या या दोन्ही त्यागी विभूूतींचा अपमान कदापी सहन केल्या जावू शकत नाही, असे वरखडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
श्री शिवाजी महाराजांचे वंशज व सातारा गादीचे छत्रपती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयराजे भोसले यांनीही आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाची गंभीर दखल घेत आ. आव्हाड व त्यांच्या समर्थकांचा यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही दिला आहे संभाजीराव भिडे व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा अपमान करणाऱ्या आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी राज्य शासनाकडे एका निवेदनातून नगरसेवक अनिल वरखडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)