विरांच्या बलिदानातून स्फूर्ती घ्या

By Admin | Updated: August 17, 2016 00:33 IST2016-08-17T00:33:43+5:302016-08-17T00:33:43+5:30

स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्या. ब्रिटीश सत्तेविरूद्ध संघर्ष केला.

Take inspiration from superstitions | विरांच्या बलिदानातून स्फूर्ती घ्या

विरांच्या बलिदानातून स्फूर्ती घ्या

अहीर यांचे आवाहन : युवकांनो, देश घडवा, कृतार्थ व्हा 
चंद्रपूर : स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्या. ब्रिटीश सत्तेविरूद्ध संघर्ष केला. अनेक अज्ञात विरांनी छातीवर गोळ्या झेलल्या. समर्पण आणि बलिदानातून मिळालेले हे स्वातंत्र्य टिकवा. त्यांच्या बलिदानातून स्फुर्ती घ्या. हा देश घडण्यिाची जबाबदारी आता आपल्यावर आहे. त्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
चंद्रपूर ते आनंदवान तिरंगा जनसंवाद मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी येथील ऐतिहासिक शहीद स्वातंत्र्यवीर पुलेश्वर बाबूराव शेडमाके स्मारकस्थळावरून झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार निघालेल्या या रॅलीमध्ये असलेली युवकांची उपस्थिती आणि उत्साह लक्षणिय होता. या प्रसंगी राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, भाजपाचे प्रदेश सदस्य विजय राऊत, मनपा गटनेते अनिल फुलझेले, खुशाल बोंडे, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, वनिता कानडे, अंजली घोटेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य संगा्राम सैनिक डॉ. र्इंगोले आणि निखिनकर यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ना. अहीर म्हणाले, ज्या स्थळावरून या यात्रेला प्रारंभ होत आहे, ते पवित्र आणि प्रेरणादायी स्थळ आहे. मिळालेले स्वातंत्र चिरायु आणि अबाधित ठेवण्यासाठी आयुष्यातील प्रत्येक क्षण खर्ची घालावा लागणार आहे. त्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन त्यांनी केले. देशाच्या सवर स्तरातील नागरिकांचे आयुष्यामान सुधारण्यासाठी पंतप्रधानांनी योजना आखल्या आहेत. देशात कुणी अर्धपोटी राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
देशाच्या सुरक्षेसाठी कुठलीही तडजोड स्विकारणार नाही. काश्मिर प्रश्नावर नाही तर यापुढे पाकव्याप्त काश्मिरावर चर्चा होईल, असे त्यांनी ठासून सांगितले.
ना. मुनगंटीवार युवकांना म्हणाले, देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या विरांचा सन्मान करून त्यातून प्रेरणा घेण्यासाठी सज्ज व्हा. त्यांचे बलिदान आपल्यामुळे वाया जाणार नाही, याची काळजी घ्या. देशाच्या प्रगतीसाठी एकसंघ प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी पुढे या. आमदार नाना श्यामकुळे यांचेही यावेळी मार्गदर्शन झाले.
वरोऱ्यात समारोप
चंद्रपुरातून निघालेल्या या रॅलीचा समारोप वरोऱ्यातील आशिर्वाद मंगल कार्यालयात झाला. वरोरामध्ये रॅली पोहचल्यावर विविध वॉर्डात फिरून सभास्थळी पोहचली. ना. अहीर यांच्या हस्ते वरोरा शहरातील माजी सैनिकांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
या वेळी झालेल्या मार्गदर्शनातून त्यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या नरविरांच्या त्यागाचा सन्मान करण्याचे आवाहन केले. तरूणाईने राष्ट्राच्या उभारणीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)

ठिकठिकाणी स्वागत
चंद्रपूर ते वरोरा मार्गात या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ना. अहीर स्वत: रॅलीत दुचाकीवर सहभागी होते. त्यामुळे युवकांमध्ये उत्साह भरला होता. चंद्रपुरातील हुतात्मा स्मारकावर मानवंदना देवून रॅली पडोली चौकात पोहचली. तिथे भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव डाहुले यांनी रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर पांढरकवडा फाटा, धानोरा मार्गे घुग्घुस येथील गांधी चौकात पोहचल्यावर सभेत रूपांतर झाले. पुढे म्हातारदेवी, साखरवाही, घोडपेठ येथील स्वागत स्विकारून भद्रावतीमधील स्मारक चौकात सभा झाली. त्यानंतर नंदोरीतही स्वागत झाले. वरोराला रॅलीचा समारोप झाला.

पावसावर मात
रॅलीला सुरूवात झाली तेव्हा सावरकर चौकात पावसाला सुरूवात झाली. मात्र कार्यकर्त्यांचा आणि युवकांचा उत्साह अफाट होता. पावसावर मात करून रॅली निघाली.

Web Title: Take inspiration from superstitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.