केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्या

By Admin | Updated: June 20, 2017 00:34 IST2017-06-20T00:34:04+5:302017-06-20T00:34:04+5:30

केंद्र शासनाने तीन वर्षाच्या काळात जनतेसाठी लोकाभिमुख निर्णय घेत १०३ योजना मंजूर केल्या. या १०३ योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, ....

Take advantage of central government schemes | केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्या

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्या

हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : सबका साथ सबका विकास संमेलन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र शासनाने तीन वर्षाच्या काळात जनतेसाठी लोकाभिमुख निर्णय घेत १०३ योजना मंजूर केल्या. या १०३ योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. केंद्र शासनाने तीन वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा संकुल येथे वेस्टर्न कोल फिल्ड लि.च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, आ. नाना श्यामकुळे, आ. कीर्तीकुमार भांगडिया, माजी आ. संजय देवतळे, अतुल देशकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समितीचे सभापती राहूल पावडे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधिक्षक नियती ठाकर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर ‘सबका साथ सबका विकास’ हे धोरण राबवून सर्वांचा विकास झाला पाहिजे यासाठी पंतप्रधान मोदी यांनी तीन वर्षात प्रधानमंत्री जनधन योजना, कौशल्य विकास, सिंचन, सुकन्या, प्रधानमंत्री आवास, पीक विमा योजना अशा विविध प्रकारच्या १०३ योजना शासनाने मंजूर केल्या आहेत. या योजनांची माहिती सर्व सामान्य नागरिकांना व्हावी व त्याचा लाभ त्यांना घेता यावा म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आ. नाना श्यामकुळे व महापौर अंजली घोटेकर यांनीही मार्गदर्शन करुन महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, गॅस वाटप व मुद्रा बँक योजनेचा लाभार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: Take advantage of central government schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.