श्वेता हॉस्पिटलवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:40+5:302021-04-25T04:28:40+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील कोविड सेंटर असलेल्या श्वेता हॉस्पिटलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक लाख रुपये ...

श्वेता हॉस्पिटलवर कारवाई करा
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील कोविड सेंटर असलेल्या श्वेता हॉस्पिटलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक लाख रुपये जादा आकारणार असल्याचे डॉक्टराने चक्क रुग्णांच्या नातेवाईकाला सांगितले आहे. ही बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यावर कारवाई करा, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व पोलीस अधीक्षक साळवे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावाने गोरगरीब जनता, सर्वसामान्य कुटुंबीयांची मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्यात खासगी रुग्णालयातील काही डॉक्टर अवाच्या सव्वा बिल आकारात आहेत. त्यामुळे करायचे काय, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडला आहे. यावर नियंत्रण करायच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या आहेत. त्यासोबतच अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या सूचनादेखील त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत.
बॉक्स
दरफलक दर्शनी भागात लावावे
त्यासोबतच अशा तक्रारी अनेक हॉस्पिटलमधून प्राप्त होत असून शासकीय दराव्यतिरिक्त अवाजवी आकारणी करणारे कोविड सेंटर्स, स्कॅन सेंटर्स यांनी शासन निर्धारित दराचे दरफलक दर्शनी भागात त्वरित लावावे व या कामी लावलेली संबंधित सरकारी अधिकाऱ्याच्या टीमने यांची अमलबजावणी करून घ्यावी अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी शनिवारी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीच्या वेळी केली.