बॉटलमध्ये पेट्रोल विकणाऱ्या पंपमालकांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST2020-02-07T06:00:00+5:302020-02-07T06:00:30+5:30
हिंगणघाट येथील तरुण प्राध्यापिका महाविद्यालयात जात असताना विकेश नागराळे या नराधमाने पेट्रोल टाकून भररस्त्यावर पेटवून दिले. यात ती तरुणी गंभीर जळाली असून आज ती मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपीने ही घटना नियोजनबद्ध पद्धतीने केली आहे. थंड डोक्याने जाणीवपूर्वक केलेले हे कृत्य असून यासाठी त्या आरोपीला कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.

बॉटलमध्ये पेट्रोल विकणाऱ्या पंपमालकांवर कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : हिंगणघाट येथील तरुण प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळून मारण्याच्या प्रयत्न करणाºया नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच राज्यात कुठेही पेट्रोल खुल्या बॉटलमध्ये विकणाऱ्या पेट्रोलपंप मालकावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. आज तसे निवेदन आमदार धानोरकर यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले.
हिंगणघाट येथील तरुण प्राध्यापिका महाविद्यालयात जात असताना विकेश नागराळे या नराधमाने पेट्रोल टाकून भररस्त्यावर पेटवून दिले. यात ती तरुणी गंभीर जळाली असून आज ती मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपीने ही घटना नियोजनबद्ध पद्धतीने केली आहे.
थंड डोक्याने जाणीवपूर्वक केलेले हे कृत्य असून यासाठी त्या आरोपीला कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. यावेळी माधुरी बोंडे, निता बोढे, गिता पोपडे, विद्या बुरान, तेजस्विनी पावडे, माया राजूरकर, विभा आगलावे, आरती डुकरे, लिना राजूरकर यांची उपस्थिती होती.
देशात अशा घटना वारंवार होता काम नये, या घटनांवर अंकुश लागायला हवे, महिलांचे जीवन सुरक्षित झाले पाहिजे. यासाठी कायद्यांमध्ये बदल करून अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
त्यासोबतच हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा. सोबतच सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध विधी तज्ज्ञ उज्वल निकम यांनी पीडितेची बाजू न्यायालयात मांडून पीडितेला न्याय द्यावा, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.