मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविली जातात. यामुळे पर्यावरणासोबतच अनेकांचे जीव धोक्यात आले आहे. आता अनेक प्रकारच्या प्लास्टिकच्या पतंग व नायलॉन मांज्याचे धागे बाजारात विक्रीस येऊ लागले. या नायलॉन मांज्यामुळे पशु-पक्षी, प्राणी व मानवांचाही जीव धोक्यात आला आहे. अनेकदा नायलॉन मांज्या अडकून प्राणही गमवावे लागले आहे. पशुपक्ष्यांच्या पायांत हे धागे अडकून त्यांनाही आपला जीव गमवावा लागत आहे. ही बाब नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव बादल बेले यांनी निदर्शनास निवेदनातून आणून दिली आहे. यावेळी संतोष देरकर, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष संदीप आदे, तालुका संघटक मनोज तेलिवार, शहर संघटक उमेश लढी, तालुका महिला सचिव ॲड. मेघा धोटे, तालुका महिला संघटिका सुनैना तांबेकर, शहर संघटक आशीष करमरकर, संदीप पोगला उपस्थित होते.
नायलॉन मांज्या विकणाऱ्यांवर कारवाई करा : तहसीलदारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST