शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

वीजेच्या तारांना स्पर्श करून आरोपीची आत्महत्या, जेलमध्ये जाण्याच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 21:10 IST

दारूविक्रीच्या प्रकरणातील एका आरोपीने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातून पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. यानंतर तो थेट उच्च वीज दाबाच्या टॉवरवर चढला. अशातच त्याने वीजेच्या तारांना स्पर्श करून आत्महत्या केली.

भद्रावती(चंद्रपूर) : दारूविक्रीच्या प्रकरणातील एका आरोपीने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातून पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. यानंतर तो थेट उच्च वीज दाबाच्या टॉवरवर चढला. अशातच त्याने वीजेच्या तारांना स्पर्श करून आत्महत्या केली. भद्रावती येथे बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. देवकुमार ऊर्फ गोली बेडू कोराम (२४) असे मृतकाचे नाव आहे. तो चंद्रपूरच्या भिवापूर परिसरातील लालपेठ मातानगर चौकातील रहिवासी आहे. अवैध दारूविक्रेत्याने अशी टोकाची भूमिका घेतल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार यांनी प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार असल्याचे सांगितले. जून २०१७ रोजी देवकुमारविरुद्ध दारूविक्रीचा गुन्हा नोंदविला होता. तेव्हापासून तो फरार होता. मंगळवार दि. २६ डिसेंबरला त्याला भद्रावती पोलिसांनी शिताफीने अटक केली. आज त्याला इतर गुन्ह्यातील दोन आरोपींसोबत येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्याकरिता पोलीस शिपाई शाहबाज सय्यद व श्रीकांत यांनी नेले. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आरोपी देवकुमारने इतर दोन आरोपींना आपली जमानत घ्यायला कुणीही नाही. त्यामुळे जेलमध्ये जावे लागेल, अशी खंत व्यक्त केली. यानंतर काहीवेळातच त्याने पोलिसांना चकमा देत तेथून पळ काढला. सुमारे १ कि.मी. अंतरावर तो धावत सुटला.  पोलीस त्याचा पाठलाग करीत होते. चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या बाजुलाच असलेल्या कटारिया ले-आऊटमध्ये तो शिरला. तेथे लागूनच असलेल्या उच्च वीज दाबाच्या वाहिनीेच्या टॉवरवर चढला. हा प्रकार अनेकांनी बघितला. त्याला खाली उतरण्यासाठी अनेकांनी विनवणी केली असता मला जेल होईल. जेलमध्ये जायचे नाही, असा तो ओरडून सांगत होता. अशातच त्याने जिवंत विद्युत तारांना स्पर्श केला. जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. घटनेचा प्राथमिक तपास भद्रावतीचे ठाणेदार बी. डी. मडावी हे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू