एकाचवेळी चार रुग्णांमुळे यंत्रणा कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:01:31+5:30

नागभीडलगतच्या ब्रम्हपुरी आणि सिंदेवाही तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराचे रूग्ण यापूर्वीच आढळून आले होते. मात्र नागभीड तालुका यापासून दूर होता. तरीही या तालुक्यातील लोक आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क होती. तालुक्याला कोरोनापासून दूर ठेवण्याचे प्रशासनाचे अविरत प्रयत्न सुरू होते. मात्र कोरोनाने यावर मात केलीच. आणि एक नव्हे तर एकाचवेळी या तालुक्यात कोरोनाचे चार रूग्ण आढळून आले.

The system worked because of four patients at a time | एकाचवेळी चार रुग्णांमुळे यंत्रणा कामाला

एकाचवेळी चार रुग्णांमुळे यंत्रणा कामाला

ठळक मुद्देनागभीड तालुका अलर्ट : परिसराचे निर्जंतुकीकरण व तपासण्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : रविवारपर्यंत कोरोनापासून दूर असलेल्या नागभीड तालुक्यात एकाचवेळी कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. या संसर्गजन्य आजाराला रोखण्याचे मोठे आव्हान आता येथील प्रशासनासमोर आहे. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे सुरू केले आहे.
नागभीडलगतच्या ब्रम्हपुरी आणि सिंदेवाही तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराचे रूग्ण यापूर्वीच आढळून आले होते. मात्र नागभीड तालुका यापासून दूर होता. तरीही या तालुक्यातील लोक आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क होती. तालुक्याला कोरोनापासून दूर ठेवण्याचे प्रशासनाचे अविरत प्रयत्न सुरू होते. मात्र कोरोनाने यावर मात केलीच. आणि एक नव्हे तर एकाचवेळी या तालुक्यात कोरोनाचे चार रूग्ण आढळून आले.
प्रशासनाने लागलीच त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यापासून तर त्या क्षेत्राला कंटनमेंट झोन जाहीर करून अवागमणास निर्बंध घातले आहेत. आरोग्य विभागाने त्वरेने पाऊल उचलत या चारही रूग्णांच्या संपर्कात जे जे व्यक्ती आले होते, त्यांचा सर्वे करून त्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवणे सुरू केले आहे. याशिवाय कुनघाडा रीठ, वैजापूर, तळोधी व नागभीडच्या कंटेनमेंट झोनमध्ये सरसकट आरोग्य विषयक सर्वे सुरू केला आहे. दरम्यान तहसीलदार मनोहर चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी विनोद मडावी यांनी सोमवारी नागभीड येथील परिस्थितीची पाहणी केली.

नागभीडमध्ये २४ तास लॉकडाऊन
नागभीड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरातील कोरोना साखळी थांबविण्याच्या दृष्टीने सोमवारी सकाळी १२ वाजेपासून मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत नागभीड पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी मुळीच घराबाहेर पडू नये व कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन न.प. उपाध्यक्ष गणेश तर्वेकर यांनी केले आहे.

Web Title: The system worked because of four patients at a time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.