धानाच्या पाण्यासाठी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

By Admin | Updated: October 17, 2015 01:32 IST2015-10-17T01:32:24+5:302015-10-17T01:32:24+5:30

करारनामा करुनही आसोला मेंढा तलावातील पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी नकारात्मक भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना ...

The symbolic funeral of the government for the drinking water | धानाच्या पाण्यासाठी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

धानाच्या पाण्यासाठी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

अखेर अधिकारी नमले : शेतीला पाणी देण्याचे लेखी आश्वासन मिळाले
चंद्रपूर: करारनामा करुनही आसोला मेंढा तलावातील पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी नकारात्मक भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी शेतकऱ्यांनी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून वठणीवर आणले. या आंदोलनाचा धसका घेऊन अखेर सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांनी नरमाईचे धोरण घेतले आणि शेतकऱ्यांना पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिले.
जिल्ह्यातील धान पिकांसह अन्य पिकांचीही स्थिती पावसाअभावी भीषणावह झाली आहे. शेतातील धानाचे उभे पिक पाण्याअभावी सुकायला लागल्याने १२ आॅक्टोबरला शेतकऱ्यांनी नांदगाव (ता. सावली) सिंचाई शाखा अभियंत्यांना भेटून शेतीसाठी या तलावाचे पाणी सोडण्याची विनंती केली होती. शेतकऱ्यांच्या शेतासाठी पाणी सोडण्याचा करारनामा या विभागाचा असल्याने तांत्रिक अडचण कसलीही नव्हती. मात्र शेतकऱ्यांनी विनंती करुनही अधिकारी मात्र ऐकायला तयार नव्हते. दिघोरी आणि गोवर्धन मायनरसाठी १६ आॅक्टोबर च्या दुपारी १ वाजेपर्यंत पाणी साडव्याचे लेखी आश्वासन १२ आॅक्टोबरला अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र ही वेळ उलटूनही अधिकारी दाद देत नव्हते. अखेर आज (शुक्रवारी) दुपारी १२ वाजता आसोला मेंढा तलावाखालील दिघोरी व गोवर्धन मायनर खालील शेतकऱ्यांनी फूटाणा क्रांसिंग ते सिंचाई कार्यालय नांदगावपर्यंत जिल्हा परिषद सदस्य विनोद अहिरकर यांच्या नेतृत्वात सरकारच्या निषेधात प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली.
शेतीलापाणी मिळालेच पाहिजे पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत नांदगाव परिसरात शेतकऱ्यांनी दणाणून सोडला. अखेर मूल तहसीलदार उपविभागीय अभियंता सिंचाई उपविभाग सावली शाखाधिकारी सिंचाई शाखा नांदगाव आणि मूल ठाणेदारांनीपाचारण केले.
शिष्टमंडळात विनोद अहिरकर, कवडू कुदावार, दिलीप म्यॉडावार, इंद्रजीत वनकर, रवी मरपल्लीवार, प्रशांत झाडे, दादाजी व्याहाडकर, प्रमोद ओदेलवार, नरेंद्र उमक, उमेश इनमवार, आशिष अहिरकर, सुधाकर बांबोळे, महेश अल्लीवार, मनोज अहिरकर आदी सहभागी होते. अखेर सिंचाई विभागाच्या शाखा अभियंत्यांनी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यावरच सर्वांचे समाधान झाले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The symbolic funeral of the government for the drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.