सुतकताईचा उपक्रम, गोडसेचा निषेध
By Admin | Updated: January 31, 2015 01:10 IST2015-01-31T01:10:19+5:302015-01-31T01:10:19+5:30
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी व जिल्हा सेवादलाच्या वतीने येथील गांधी चौकात सुतकताई करून गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली.

सुतकताईचा उपक्रम, गोडसेचा निषेध
चंद्रपूर : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी व जिल्हा सेवादलाच्या वतीने येथील गांधी चौकात सुतकताई करून गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली. सोबतच नत्थुराम गोडसेंना देशभक्त संबोधणाऱ्यांचा निषेध करीत घोषण्या देण्यात आल्या. गांधी चौकात निषेध फलकही लावण्यात आले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही जटपुरा गेटवर महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून श्रध्दांजली वाहिली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही जटपुरा गेटवर मुक आंदोलन करीत नत्थुराम गोडसेचे समर्थन करणाऱ्यांचा निषेध केला.
चंद्रपूर जिल्हा सर्वोदय मंडळ, काँग्रेस सेवादल व चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या संयुक्त विद्यमाने सकाळी १० वाजतापासून नत्थुराम गोडसे यांना देशभक्त संबोधणाऱ्या निषेधार्थ धरणा देण्यात आला. याप्रसंगी देवराव दुधलकर, प्रा. प्रमोद राखुंडे, राहुल पुगलिया, गजानन गावंडे, अॅड.अविनाश ठावरी उपस्थित होते.
सावली येथील नाग विदर्भ चरखा संघाचे वतीने व सर्वोदयाचे कार्यकर्त्यांचे वतीने चरख्यावर सुत कताईचा कार्यक्रम चरख्यावर सुरू करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नत्थूराम गोडसे देशभक्त कसा? महात्मा गांधीजींच्या हत्याराचा उदो-उदो करणाऱ्यांचा निषेध असो, आदी घोषणा फलक व चरख्यावर सुरू असलेली सुतकताई कार्यक्रम लोकांचे लक्ष वेधून घेत होते. दरम्यान राष्ट्रवादीच्या मुक आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल, संदिप गड्डमवार, महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके, महादेव पिदुरकर, अमित उमरे, डी.के. आरीकर, शशीकांत देशकर, खुशाल लोडे, ज्योती रंगारी आदी सहभागी झाले.
शहर काँग्रेस कमेटी
चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात दुपारी १ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर, केशव रामटेके, सुरेश दुर्शेलवार, दीपक कटकोजवार, वंदना भागवत, सुभाष दोनोडे, सुलेमान अली, देविदास गुरनुले, निखिल धनवलकर, सागर वानखेडे, वैशाली गेडाम, गौतम मेश्राम, रणधीर शंभरकर, दिगांबर आमटे, किशोर धोटे, रामाजी हजारे, विक्रम खनके उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतितीनिमित्त श्रद्धांजली वाहन्यात आली.
महानगरपालिकेत कार्यक्रम
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मनपात आदरांजली वाहन्यात आली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रितेश तिवारी, आयुक्त सुधीर शंभरकर, झोन क्रं. १ चे सभापती रवि गुरुनुले व नगरसेविका अंजली घोटेकर यांचे हस्ते सकाळी १०.१५ वाजता हुतात्मा स्मारक व सकाळी ११ वाजता गांधी चौक येथील महात्मा गांधी येथील पुतळ्याला मालार्पण व आदरांजली वाहण्यात आली.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्याने देशविघातक कृतींचा, अपप्रवृत्तींचा निषेध करण्याकरीता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्थानिक महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मुक आंदोलन करून निषेध नोंदविला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, उपाध्यक्ष अमोल ठाकरे, विधानसभा अध्यक्ष शशीकांत देशकर, सुनिल काळे, बब्बु शेख, शहर अध्यक्ष सुजित उपरे, गजानन पाल, प्रदीप रत्नपारखी, संजु ठाकुर, पवन मेश्राम, राहुल भगत, राज तुरकर उपस्थित होते.