महापौर निवडणुकीच्या तोंडावर मनपा गटनेत्याचे निलंबन

By Admin | Updated: October 28, 2014 22:53 IST2014-10-28T22:53:39+5:302014-10-28T22:53:39+5:30

महानगर पालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमधील गटबाजी शमविण्यासाठी पक्षाने अखेर निलंबनाचे हत्यार उपसले आहे. निवडणूक निरीक्षक निरीन राऊत यांनी बैठकीला

Suspension of Municipal Group Leader in the face of mayor election | महापौर निवडणुकीच्या तोंडावर मनपा गटनेत्याचे निलंबन

महापौर निवडणुकीच्या तोंडावर मनपा गटनेत्याचे निलंबन

चंद्रपूर : महानगर पालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमधील गटबाजी शमविण्यासाठी पक्षाने अखेर निलंबनाचे हत्यार उपसले आहे. निवडणूक निरीक्षक निरीन राऊत यांनी बैठकीला बोलावूनही अनुपस्थित राहणारे काँग्रेसचे मनपातील गटनेते संतोष लहामगे यांना मंगळवारी पक्षातून निलंबित करण्यात आले. त्यांच्या पदाची जबाबदारी आता प्रशांत दानव यांच्याकडे देण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक नितीन राऊत यांनी मंगळवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही निलंबनाची घोषणा केली.
मनपा महापौर निवडणूक निरीक्षक म्हणून नितीन राऊत यांनी आज मंगळवारी महापौर संगीता अमृतकर, गटनेते संतोष लहामगे, नगरसेवक प्रशांत दानव, आणि महानगर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांच्याशी चंद्रपुरातील विश्रामगृहावर बैठक ठेवली होती. महापौर संगीता अमृतकर, स्थायी समिती सभापती रामू तिवारी आणि गटनेते संतोष लहामगे यांनी विश्रामगृहावर येऊन राऊत यांची भेट घेतली. मात्र बैठकीत सहभागी होण्याचे टाळले.
यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना नितीन राऊत म्हणाले, पक्षीय व्यासपीठावर येऊन आपले मत मांडण्याची संधी या तिघांनाही दिली होती. मात्र त्यांनी जाणिवपूर्वक पाठ फिरविली. संतोष लहामगे यांचे वर्तनही पक्षाच्या शिस्तीत बसणारे नव्हते. महापौरांशी आपण मोबाईलवरून संपर्क साधला मात्र बाहेरगावी असल्याचे सांगून त्यांनी येण्याचे टाळले. रामू तिवारी यांनाही मोबाईलवरून संपर्क साधला. मात्र त्यांनी फोनच उचलला नाही. गटनेता या नात्याने संतोष लहागमे यांची जबाबदारी महत्वाची असतानाही त्यांनीही पाठ फिरविल्याने त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले. स्थायी समितीचे सभापती आणि महापौरांवरही कारवाईची शिफारस आपण पक्षाध्यक्षांकडे करणार असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले.
उमेदवाराची घोषणा
प्रांताध्यक्ष करणार
काँंग्रेसच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा मुंबईतून प्रांताध्यक्ष करतील, अशी माहिती नितीन राऊत यांनी एका उत्तारात दिली. ते म्हणाले, काँग्रेसच्या नगरसेवकांची बुधवारी बैठक होईल. त्यात पक्षाकडून उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल. हे नाव प्रदेशाध्यक्षांना कळविल्यावर त्यांच्याकडून महापौरपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल. आपल्याकडे सध्या तीन नावे आली आहेत. मात्र कुणाचेही नाव अद्याप नक्की झालेले नसल्याची माहिती त्यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Suspension of Municipal Group Leader in the face of mayor election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.