पोलीस उपनिरीक्षकासह हेड कॉन्सटेबल निलंबित
By Admin | Updated: June 17, 2015 01:52 IST2015-06-17T01:52:04+5:302015-06-17T01:52:04+5:30
दारूविक्रेत्यावर कारवाईसाठी चिरमीरी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मूलच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह हेड कॉन्सटेबला जिल्हा

पोलीस उपनिरीक्षकासह हेड कॉन्सटेबल निलंबित
मूल : दारूविक्रेत्यावर कारवाईसाठी चिरमीरी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मूलच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह हेड कॉन्सटेबला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले.
साकोलीवरुन नागभीड-सिंदेवाही-मूल मार्गे चंद्रपूरला टाटा सुमोने ५० देशी दारूच्या पेट्या नेत असताना मूल पोलिसांनी बसस्थानका जवळ नाकेबंदी करून एक लाख २० हजार रुपयाची दारू पकडली. चंद्रपूरचे संजय माधव वासेकर व हिरा जनार्धन वाघमारे यांचा दारू वाहतूक परवाना जप्त केल्यानंतर आरोपीकडून चिरीमिरी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जाधव व पोलीस कॉन्स्टेबल जांभुळे यांनी आरोपींना त्रास देणे सुरू केले. ही बाब पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तपासाअंती दोघांना निलंबित केले आहे.
दारू वाहतूक करणाऱ्यांकडे लाखांदूर पर्यंत दारू वाहतूकीचा परवाना होता. त्यांना मूलला पकडल्यानंतर परवाना जप्त करण्यात आला. परवाना देण्यासाठी पीआय जाधव व कॉन्सटेबल जांभुळे यांनी चिरीमिरी घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत रेकॉर्र्डींगसह ही बाब पोलीस अधीक्षकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी निलंबनाची कारवाई केली. (तालुका प्रतिनिधी)