कोरोनाच्या लढ्यासाठी जिवतीत जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:27 IST2021-04-18T04:27:12+5:302021-04-18T04:27:12+5:30
जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढतीवर असतानाही जिवती तालुक्यात कोरोनाचा रुग्ण नव्हता. मात्र, आता रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सद्य:स्थितीत जिवती तालुक्यात ...

कोरोनाच्या लढ्यासाठी जिवतीत जनता कर्फ्यू
जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढतीवर असतानाही जिवती तालुक्यात कोरोनाचा रुग्ण नव्हता. मात्र, आता रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सद्य:स्थितीत जिवती तालुक्यात --- रुग्ण आहेत. त्यापैकी जिवती नगरपंचायत क्षेत्रात ४३ रुग्ण आहेत, तर ४० रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला आवाहनाला प्रतिसाद देत येथील व्यापारी बांधवांनी व नागरिकांनी १७ ते ३० एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यू पुकारला आहे. कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी शहरातील संपूर्ण रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. केवळ वैद्यकीय सेवा सुरू होत्या. नगरपंचायतच्या मुख्याधिकारी कविता गायकवाड यांच्या मार्गदर्शनात नगरपंचायतीचे कर्मचारी विनाआवश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत.
कोट
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, आवश्यक काम असेल तर मास्क घालूनच बाहेर पडावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- कविता गायकवाड, मुख्याधिकारी जिवती