सर्पमित्राने दिले नागाला जीवदान
By Admin | Updated: March 30, 2015 00:44 IST2015-03-30T00:44:17+5:302015-03-30T00:44:17+5:30
पांजरेपार येथे साडेसहाफूट लांबीचा गव्हाऱ्या नाग आढळून आला.

सर्पमित्राने दिले नागाला जीवदान
नागभीड: पांजरेपार येथे साडेसहाफूट लांबीचा गव्हाऱ्या नाग आढळून आला. या सापाला येथील सर्पमित्र अमोल वानखेडे यांच्यामुळे जिवदान मिळाले.
गावाच्या लगत असलेल्या शेतात एक महिला काम करीत असताना तिला हा साप दिसला. घाबरल्याने तिने आरडा ओरड केली. तिच्या आरडा ओरडीन गावकरी काठ्या घेवून धावले आणि त्या सापाला मारण्यासाठी ते साप शोधू लागले. यावेळी नागभीड येथील सर्पमित्र अमोल वानखेडे हे काही कामासाठी पांजरेपारला गेले होते.
नागरिक हातात काठ्या घेवून कशासाठी धावत आहेत, याची चौकशी केली. तेव्हा खरा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी नागरिकांना सापाला मारू नये अशी विनंती केली. आणि त्या सापास अगदी सहज बाटलीबंद करुन वनविभागाच्या मदतीने जंगलात सोडले. साप बाटली बंद झाल्यानंतर गावकरण्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (तालुका प्रतिनिधी)
रस्त्याचे काम संथगतीने
चंद्रपूर: बिनबागेट ते रामनगर चौकापर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे. मात्र सदर काम संथगतीने सुरु असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.