छत्तीसगडच्या मजुरांना प्रियदर्शनी विद्यालयाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:46+5:30

माजी आमदार निमकर यांना माहिती होताच त्यांनी रामपूर येथील प्रियदर्शनी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज पावडे यांना या मजुरांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या वतीने एक क्विंटल तांदूळ, एक क्विंटल गहू, तेल पिता, पन्नास किलो तुर डाळ दिली. सोबतच भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्याकडून एक वेळच्या जेवणाची सोय करून दिली.

Support of Priyadarshani School to the laborers of Chhattisgarh | छत्तीसगडच्या मजुरांना प्रियदर्शनी विद्यालयाचा आधार

छत्तीसगडच्या मजुरांना प्रियदर्शनी विद्यालयाचा आधार

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे उपासमारी : तीन क्विंटल धान्याचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : राजुरा शहरात छत्तीसगढ येथून मजुरीसाठी आलेल्या २५ कामगारांकडे अन्नधान्य नसल्याने या कामगारावर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी या कामगारांनी प्रियदर्शिनी विद्यालयात आधार दिला असून शासनाच्या मदतीने त्यांना धान्याचे वितरणही करण्यात आले.
छत्तीसगढ राज्यातील रांजणगाव जिल्ह्यातील २५ कामगार मागील दोन वर्षांपासून राजुरा शहरातील डोहेवाडी परिसरात घर बांधणीच्या कामावर मजूर म्हणून काम करतात. लॉकडाऊनमुळे मागील एक आठवड्यापासून त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या जवळचे असलेले अन्नधान्य संपले. त्यानंतर मात्र पोटाची खळगी कशी भरायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला.
याबाबत माजी आमदार निमकर यांना माहिती होताच त्यांनी रामपूर येथील प्रियदर्शनी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज पावडे यांना या मजुरांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या वतीने एक क्विंटल तांदूळ, एक क्विंटल गहू, तेल पिता, पन्नास किलो तुर डाळ दिली. सोबतच भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्याकडून एक वेळच्या जेवणाची सोय करून दिली.
यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, विमाशीचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, अन्नपुरवठा निरीक्षक विकाससिंग राजपूत, पत्रकार संघाचे अध्यक्ष बी. यु. बोर्डेवार, फारुख शेख, प्रा. जाकीर सय्यद, श्रीकृष्ण गोरे आदींची उपस्थिती होती.
पोलीस बांधवातर्फे गरजुंना अन्नदान
कोरपना : रस्त्यावर अडलेल्या व भुकेल्यांना कोरपना येथील पोलीस बांधवांकडून नागरिकांच्या सहकार्याने अन्नदान करण्यात आले.
सद्यस्थितीत कोरोनामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे दळणवळणाच्या सोयी बंद करण्यात आल्या आहे. परंतु अनेकांना निवारा नसल्याने ते पायदळच प्रवास करीत आहे. त्यांना होणारी अडचण लक्षात घेता ही सोय करण्यात आली.
भद्रनाथ युथ फाऊंडेशनतर्फे मदत
भद्रावती : येथील युथ फाऊंडेशनच्या वतीने गरजू कुटुंबांना जिवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे. यासाठी भद्रनाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष फय्याज शेख, रोषण कोमरेड्डीवार, अमोल बडगे, इम्रान शेख, निलेश जगताप, बशीभाई, नफीश शेख, आमीर शेख, तन्नशुख, सतीश कवाडे, शुभम बगडे आदी नागरिक प्रयत्न करीत आहेत.

चंद्रपूर : संचारबंदी लागू केल्याने मजूर वर्गांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दुर्गापूर येथील सेंट मिखाईल चर्चच्या वतीन ‘भला सामरी, संकट मे सहाय्यक’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना पाच किलो आटा, पाच किलो तांदूळ, एक किलो डाळ, एक लिटर तेल, मीठ, मिरची, हळदी पॅकेट आदी जीवनावश्यक वस्तूंचे पॉकेट बनवून भेट देण्यात येत आहे. त्यासाठी चर्चच्या सदस्यांनी अन्न धान्य, याशिवाय आर्थिक मदत केली. जास्तीत जास्त गरजूपर्यंत जिवनावश्यक वस्तूंचे पॉकेट पोहचवण्याचा मानस चर्चच्या सदस्यांनी व्यक्त केला. हा उपक्रम रेव्ह. आमीन कलवले यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात येत आहे.
 

Web Title: Support of Priyadarshani School to the laborers of Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.