माहुरकर परिवाराला नारी शक्तीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:40+5:302021-04-03T04:24:40+5:30

चंद्रपूर : २४ मार्चला शहरातील पडोली चौकात ट्रकच्या धडकेत ४५ वर्षीय भगवान माहुरकर यांचा मृत्यू झाला. मजुरी करून आपल्या ...

Support of Nari Shakti to Mahurkar family | माहुरकर परिवाराला नारी शक्तीचा आधार

माहुरकर परिवाराला नारी शक्तीचा आधार

चंद्रपूर : २४ मार्चला शहरातील पडोली चौकात ट्रकच्या धडकेत ४५ वर्षीय भगवान माहुरकर यांचा मृत्यू झाला. मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या भगवानच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी आली होती. मात्र नारी शक्ती संघटनेने पुढाकार घेत माहुरकर परिवाराला ट्रक मालकाकडून आर्थिक मदत मिळवून दिली. भगवान माहुरकर यांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे त्यांच्यामागे पत्नी प्रीती माहुरकर, नऊ वर्षांची मुलगी व आठ वर्षांचा मुलगा रोहन हे कुटुंब उघड्यावर आले. त्यामुळे नारी शक्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन गृहोपयोगी वस्तू व किराणा साहित्य भेट दिले तसेच दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. नारी शक्ती संघटनेला नव्याने जुळलेल्या डॉ. शर्मिली पोद्दार यांनीसुद्धा आपला वाढदिवस गरजू कुटुंबाला मदत करीत साजरा केला. यावेळी नारी शक्ती संघटनेच्या अध्यक्ष सुनीता गायकवाड, उपाध्यक्ष सायली येरणे, डॉ. शर्मिली पोद्दार, प्रेमिला बावणे, पूजा शेरकी, अर्चना आमटे, माला पेंदाम, अनिता झाडे आदी उपस्थित होत्या.

Web Title: Support of Nari Shakti to Mahurkar family