गुरुबक्सानी कंपनीतर्फे वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:27 IST2021-05-22T04:27:01+5:302021-05-22T04:27:01+5:30

सावली : डी. सी. गुरुबक्सानी कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे सावली तालुक्यातील फ्रट लाईन कोरोना योद्धांसाठी वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा करण्यात आला. कंपनीचे ...

Supply of medical supplies by Gurubaksani Company | गुरुबक्सानी कंपनीतर्फे वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

गुरुबक्सानी कंपनीतर्फे वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

सावली : डी. सी. गुरुबक्सानी कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे सावली तालुक्यातील फ्रट लाईन कोरोना योद्धांसाठी वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा करण्यात आला. कंपनीचे सागर निंबायकर, राजकुमार मेघवानी यांनी तहसीलदारा परीक्षित पाटील, तालुका आरोग्य अधिकारी मनोहर मडावी, वैद्यकीय अधिकारी सौरभ गोबाडे यांच्याकडे साहित्य सुपूर्द केले. सावली तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी तालुका प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत आहे. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील समाजिक संस्था, राईसमिल संघटना पुढे आल्या. यासोबत डी. सी. गुरुबक्सानी कन्स्ट्रक्शन कंपनीने तालुक्यातील कोरोना योद्ध्यांना वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा केला. यामध्ये पीपीई किट, एन ९५ मास्क, ग्लोव्हज, फेसशिल्ड आदी साहित्यांचा समावेश आहे. तहसीलदार परीक्षित पाटील यांनी कंपनी प्रशासनाचे आभार मानले.

Web Title: Supply of medical supplies by Gurubaksani Company