शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

सुपर फूड असणारे चिया शेतकऱ्यांसाठीही सुपर; ‘आत्मा’कडून जिल्ह्याभरात जनजागृती 

By परिमल डोहणे | Updated: February 7, 2024 19:12 IST

पिकाची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी आत्मा कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती.

चंद्रपूर: पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्न देणारे व आर्थिक नफा कमवून देणाऱ्या पिकांची लागवड करावी, यासाठी आत्माकडून नावीण्यपूर्ण पीक लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सुपर फूड मानले जाते. कमी उत्पादन खर्च आणि मोठी मागणी यामुळे शेतकरी चांगली आर्थिक कमाई करू शकतात. प्रायोगिक तत्त्वावर कोरपना तालुक्यातील बाखर्डी येथील युवा शेतकऱ्याने चिया पिकाची लागवड केली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या प्लॉटला आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्लॉटची पाहणी केली. तसेच, सुपर फूड मानले जाणारे चिया बियाणे शेतकऱ्यांसाठीही सुपर ठरू शकते, असे मार्गदर्शन केले.

जिल्ह्यात खरीप हंगामात भात, सोयाबीन, कापूस व रब्बी हंगामात हरभरा व गहू या पारंपरिक पिकांची लागवड करतात. परंतु, बदलत्या हवामानाचा परिणाम, निसर्गाचा लहरीपणा यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे उत्पादन कमी होत आहे. शिवाय उत्पादित होणारा माल व त्याकरिता करण्यात येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही. शेतीवरील वाढलेला खर्च व त्यातून मिळणारा कमी नफा यामुळे शेतकऱ्यांना शेती अधिक जोखमीची झाली आहे. यावर पर्याय म्हणून विविध शाश्वत उत्पन्न देणारी पिके लागवड करण्याचा प्रयत्न कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मामार्फत सुरू आहे. खरीप व रब्बी हंगामात पारंपरिक पिकाला पर्यायी पीक म्हणून मोहरी, जवस सारखी तेल बिया उत्पादने, तसेच चिया लागवडीसारखे प्रयोग घेण्यात आले. या पिकाची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी आत्मा कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. त्यातून धडे घेऊन कोरपना तालुक्यातील बाखर्डी येथील शेतकऱ्यांनी चिया बियाण्यांची लागवड केली. आत्माच्या संचालक प्रीती हिरळकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत शेतकऱ्याला मार्गदर्शन केले.

खरेदीदार-विक्रेते यांचीही घालून दिली भेटचियामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे बाजारात चांगला भाव आहे. चिया बियाणे वनस्पतीस एक विशेष वास असतो. याच्या पानांवर केस वाढतात यामुळे प्राणी त्यापासून दूर राहतात. त्यामुळे नुकसान टळते. मागील महिन्यात आत्माने घेतलेल्या कार्यशाळेत शेतकऱ्यांना चिया पीक विकत घेणारे खरेदीदार, तसेच विक्रेता यांच्यासोबत चर्चा व समन्वय घडवून आणल्याने त्याची खरेदी-विक्रीसुद्धा सोयीची झाली आहे.

काय आहे चिया बियाणेचिया ही एक उबदार हवामानातील वार्षिक औषधी वनस्पती आहे. हे बियाणे काळ्या प्रकारचे असते. साधारणपणे पाच फुटांपर्यंत ही झाडे वाढत असतात. पौष्टिक आणि आरोग्य फायद्यांमुळे सद्य:स्थितीत हे बियाणे लोकप्रिय झाले आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरFarmerशेतकरी